नवी दिल्ली - मराठमोठा भालाफेकपटू आणि हरियाणाचा लाल नीरज चोप्रा याने सुवर्ण पदक पटकावून इतिहास रचला आहे. यापूर्वी त्याच्यासारखी कामगिरी कुणीच केलेली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला खास आमंत्रित केले होते. यावेळी त्याला खास चुरमा खायला देण्यात आला होता. त्याने केलेल्या या कामगिरीनंतर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. आता तो भारतातील अबालवुद्धांचा गळ्यातील ताईत झाला आहे. आता त्याच्याबाबत एक नवीन बातमी हाती लागली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची भेट घेतली आहे. या दोघांच्या जीवनावर बायोपिक येणार असल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत.
नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला भालाफेकपटू ठरला आहे. ब्रिटिश भारताकडून खेळलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये याच कॅटेगरीत दोन पदके जिंकली होती, अशी नोंद सापडते. परंतु ते इंग्रज होते, भारतीय नव्हते. त्यामुळे भारताकडून खेळले असले तरी त्याचे श्रेय भारतीयांना जात नाही. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे.
हेही वाचा - कोल्हापुरच्या पृथ्वीराज पाटलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्य पदकाची कमाई, रशियाच्या मल्लास लोळवले