लंडन - जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला सार्बियाचा खेळाडू नोवाक जोकोव्हिचने इटलीच्या माटिओ बेरेट्टिनीचा पराभव करत सहाव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. माटिओने पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये जिंकला. त्यानंतर जोकोव्हिचने दबाब जुगारून खेळ करत पुढील तिन्ही सेट जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. जोकोव्हिचने अंतिम सामना ६-७ (४-७), ६-४, ६-४, ६-३ अशा फरकाने जिंकला. जोकोव्हिचचे हे विक्रमी २०वे विजेतेपद आहे. त्याने राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
-
This legendary tale gains yet another chapter.@DjokerNole is the #Wimbledon champion for a sixth time pic.twitter.com/3nTlNNMJY2
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This legendary tale gains yet another chapter.@DjokerNole is the #Wimbledon champion for a sixth time pic.twitter.com/3nTlNNMJY2
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021This legendary tale gains yet another chapter.@DjokerNole is the #Wimbledon champion for a sixth time pic.twitter.com/3nTlNNMJY2
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021
- पहिला सेट
पहिला सेट दोन्ही खेळाडूंमध्ये खूपच रोमांचक राहिला. एकवेळ जोकोव्हिचने ५-२ अशी सोपी आघाडी मिळवली होती. परंतु बेरेट्टिनीने शानदार वापसी करत बाजी पलटवली. त्याने हा सेट ६-६ अशा बरोबरीत आणला. त्यानंतर त्याने ट्रायब्रेकरमध्ये बाजी मारत हा सेट ७-६ (७-४) असा आपल्या नावे केला.
- दुसरा सेट
दुसऱ्या सेटमध्ये देखील दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. जोकोव्हिचने पहिल्या सेट सारखी यात देखील ५-१ अशी आघाडी मिळवली. तेव्हा बेरेट्टिनीने शानदार वापसी करत हा सेट ५-४ अशा स्थिती आणला. पण यावेळी जोकोव्हिचने बेरेट्टिनीला संधी दिली नाही आणि हा सेट त्याने ६-४ अशा फरकाने आपल्या नावे केला.
- तिसरा सेट
तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने पहिल्या पासून आघाडी घेतली. त्याने ३-१ अशी आघाडी घेतली. तेव्हा बेरेट्टिनीने वापसी करण्याचा प्रयत्न करत ४-३ अशी स्थिती निर्माण केली. परंतु, जोकोव्हिचने अनुभव पणाला लावत हा सेट देखील ६-४ अशा फरकाने जिंकला.
- चौथा सेट
बेरेट्टिनीला चौथ्या सेट कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार होता. त्याने जोकोव्हिचला कडवी झुंज दिली. एक वेळ सामना ३-३ अशा बरोबरीत होता. परंतु गतविजेत्या जोकोव्हिचने युवा बेरेट्टिनीला उलटफेर करण्याची संधीच दिली नाही. त्याने हा सेट ६-३ असा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली.
नोवाक जोकोव्हिच सुपर फास्ट
आजचा महामुकाबला जिंकत सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्याने रॉजर फेडरर आणि राफेल नदालच्या विक्रमाशी बरोबरी साधली. जोकोव्हिचचे हे २०वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यामध्ये ६ विम्बल्डन विजेतेपदांचा समावेश आहे. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. दरम्यान, यावेळी राफेल नदालने विम्बल्डनमधून माघार घेतली. तर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर रॉजर फेडररला गाशा गुंडाळावा लागला आहे.
-
🏆 2011
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🏆 2014
🏆 2015
🏆 2018
🏆 2019
🏆 2021#Wimbledon | @DjokerNole pic.twitter.com/UrFvlsgIzY
">🏆 2011
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021
🏆 2014
🏆 2015
🏆 2018
🏆 2019
🏆 2021#Wimbledon | @DjokerNole pic.twitter.com/UrFvlsgIzY🏆 2011
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021
🏆 2014
🏆 2015
🏆 2018
🏆 2019
🏆 2021#Wimbledon | @DjokerNole pic.twitter.com/UrFvlsgIzY
अंतिम सामन्यात महिला पंच -
विम्बल्डनच्या १४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात महिलेने पंच भूमिका निभावली. आजच्या सामन्यात मारिया सिसक यांनी गोल्ड बॅज चेअर पंच म्हणून अंतिम सामन्यात काम पाहिले. २०१२ पासून त्या महिला टेनिस फेडरेशन (डब्ल्यूटीए) एलिट टीमच्या सदस्या आहेत. टेनिसमधील सर्वाधिक श्रेणीतील पंचांना गोल्ड बॅज मिळतो. या आधी सिल्वर, ब्राँझ आणि ग्रीन बॅजेस आहेत.
हेही वाचा - भारतीय वंशाच्या समीर बॅनर्जीने पटकावले ज्यूनिअर विम्बल्डनचे विजेतेपद
हेही वाचा - विम्बल्डनला मिळाली नवी विजेती; ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने इतिहास घडवला