ETV Bharat / sports

Wimbledon : रॉजर फेडरर, अलेक्झांडर झ्वेरेव आणि कोको गॉफ चौथ्या फेरीत - roger federer BEAT Cameron Norrie

पुरूष एकेरीत स्वित्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडररने कॅमेरून नोर्रीचा तर जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव याने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा पराभव करत चौथी फेरी गाठली.

wimbledon-2021-coco-gauff-defeats-kaja-juvan-in-straight-sets-to-move-onto-the-fourth-round-wimbledon
Wimbledon : रॉजर फेडरर, अलेक्झांडर झ्वेरेव आणि कोको गॉफ चौथ्या फेरीत
author img

By

Published : Jul 3, 2021, 10:46 PM IST

Updated : Jul 3, 2021, 10:56 PM IST

लंडन - अमेरिकेची १७ वर्षीय युवा टेनिसपटू कोको गॉफ हिने काजा जुवानचा ६-३, ६-३ अशा फरकाने पराभव करत चौथी फेरी गाठली. गॉफ २०१९ मध्ये चौथी फेरी गाठण्यात अपयशी ठरली होती. तिचा पुढील सामना सोमवारी विम्बल्डन चॅम्पियन अँजेलिक कर्बर हिच्याशी होणार आहे. दुसरीकडे पुरूष एकेरीत स्वित्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडररने कॅमेरून नोर्रीचा तर जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेवने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा पराभव करत चौथी फेरी गाठली.

पुरुष एकेरीत तिसऱ्या फेरीत फेडररने कॅमेरुनविरुद्धचा सामना ६-४, ६-४, ५-७, ६-४ अशा फरकाने जिंकला. तर अलेक्झांडर झ्वेरेवची गाठ टेलरशी झाली. तेव्हा हा सामना झ्वेरेवने ७-६ (७-३), ६-४, ६-३, ७-६ (७-४) अशा फरकाने जिंकला. सातव्या मानांकित इटलीच्या मॅटिओ बेरेटिनी याने स्लोव्हाकियाच्या एलजाज बेडेने याचा ६-४, ६-४, ६-४ अशा फरकाने पराभव करत पुढील फेरी गाठली.

महिला एकेरीत इम्मा राडूकानू विम्बल्डनची चौथी फेरी गाठणारी इंग्लंडची पहिली युवा खेळाडू ठरली. १८ वर्षीय राडूकानू आपला पहिलाच ग्रँडस्लॅम खेळत आहे. तिने तिसऱ्या फेरीत रोमानियाची अनुभवी टेनिसपूट सोराना क्रिस्टीचा ६-३, ७-५ ने पराभव केला.

अँजेलिक कर्बर हिने पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यात बेलारुसची अलिकसनद्रा ससननोविच हिचा २-६, ६-०, ६-१ ने पराभव केला. विम्बल्डन २०२१ ग्रँडस्लॅम स्पर्धेत कर्बर एकमात्र माजी विजेती खेळाडू राहिली आहे.

हेही वाचा - Ind W Vs Eng W ३rd ODI : झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम, असा कमाल करणारी जगातील एकमेव गोलंदाज

हेही वाचा - Ind W Vs Eng W ३rd ODI : स्मृती मंधानाने सीमारेषेजवळ घेतला अफलातून झेल, पाहा व्हिडिओ

Last Updated : Jul 3, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.