लंडन - विम्बल्डन स्पर्धेमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि त्याचा फ्रान्सचा जोडीदार बेनोएट पेयरे यांना पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. पाच सेटमध्ये रंगलेल्या या सामन्यात कझाकिस्तानचा एलेक्झेंडर बुबलिक आणि मिखाईल कुकुशाकिन या जोडीने ४-६ ६-७, ६-३, ७-६, ९-७ असा पेसच्या जोडीचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात भारताचा टेनिस खेळाडू पूरव राजा आणि जीवन नेदुनचेझियन या जोडीचाही पराभव झाला. तर भारताचा दिविज शरण आपल्या जोडीदारासह दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.
भारतीय खेळाडूंचे आज तीन सामने झाले. या तीन सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंचा पराभव होऊन ते स्पर्धेबाहेर पडले आहेत. त्यामध्ये लिएंडर पेस आणि पूरव राजा याचा समावेश आहे. तर दिविज शरण दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.
पूरव राजा आणि जीवन नेदुनचेधियनेच्या जोडीला ऑस्ट्रेलियाची लेटन हेविट आणि जार्डन थाम्पसनच्या जोडीने ६-२, ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. एक तास ४२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाची जोडी वरचढ ठरली.
दिविज शरण आणि त्याचा ब्राझीलचा जोडीदार मार्सेलो डेमोलिनर यांचा जर्मनच्या केविन क्राविच आणि आंद्रियस मीस या जोडीने पराभव केला. एक तास ५६ मिनिट चाललेल्या या सामन्यात ७-५, ६-४, ७-५ असा शरणचा पराभव जर्मनच्या खेळाडूंनी केला.