बांजा लूका - दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर विरुध्द पहिला सेट जिंकणारा भारताचा टेनिसपटू सुमिन नागल याला बांजा लूका टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा धक्का बसला. सुमितचा अंतिम फेरीत नेदरलँडचा खेळाडू टालोंन ग्रीकस्पूर याने पराभव केला.
हेही वाचा - ठरलं....नोव्हेंबरच्या शेवटी खेळवण्यात येणार भारत-पाक सामना
जागतिक क्रमवारीत १७४ स्थानावर असलेल्या सुमितने उपांत्य फेरीत स्लोवाकियाच्या फिलीप होरांस्की याचा ७-६, ६-२ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. यामुळे सुमितच्या स्पर्धा जिंकण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, टालोंनने सुमितचा २-६, ३-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत जेतेपद पटकावले.
हेही वाचा - तीन मुलांची आई किम क्लाइस्टर्स टेनिसच्या मैदानावर परतणार
दरम्यान, सप्टेंबर २०१७ मध्ये बंगलुरु ओपननंतर सुमितने पहिल्यांदाच एटीपी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. २२ वर्षीय सुमितने मागील महिन्यात झालेल्या यूएस ओपन स्पर्धेत रॉजर फेडरर विरुध्द पहिल्या सेट जिंकला होता. मात्र, त्यानंतर फेडररने त्याला आपल्या अनुभवाच्या जोरावर पराभूत केले होते.