नवी दिल्ली - तब्बल 23 ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्सने अलीकडेच टेनिस कोर्टात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ती मुलगी ऑलिम्पियासमवेत कोर्टवर टेनिसचा सराव करताना दिसून आली. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
ऑलिम्पिया आणि सेरेना दोघांनीही एकाच रंगाचा टेनिस सूट घातला होता. एका फोटोमध्ये ते समान पोझमध्ये उभे आहेत. सेरेना विल्यम्स फेब्रुवारीपासून टेनिसपासून दूर आहे. तिने नुकतीच आगामी यूएस ओपनमध्ये खेळण्याची घोषणा देखील केली आहे.
-
Tennis champion Serena Williams shares adorable on-court moment with Alexis Olympia Ohanian Jr#SilverSports pic.twitter.com/2yTBJaJJFj
— OKYERE KWAME TAWIAH 🇬🇭🦅 (@okt_ranking) July 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tennis champion Serena Williams shares adorable on-court moment with Alexis Olympia Ohanian Jr#SilverSports pic.twitter.com/2yTBJaJJFj
— OKYERE KWAME TAWIAH 🇬🇭🦅 (@okt_ranking) July 3, 2020Tennis champion Serena Williams shares adorable on-court moment with Alexis Olympia Ohanian Jr#SilverSports pic.twitter.com/2yTBJaJJFj
— OKYERE KWAME TAWIAH 🇬🇭🦅 (@okt_ranking) July 3, 2020
पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेरेना 40 वर्षांची होईल. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्यासाठी खेळणे आव्हानात्मक असेल. सेरेनाची मुलगी ऑलिम्पिया यावर्षी सप्टेंबरमध्ये 3 वर्षांची होईल. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यादरम्यान सेरेनाने तिची बहीण व्हिनस विल्यम्सचे आव्हान मोडून काढत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. महत्त्वाचे म्हणजे, सेरेना तेव्हा गरोदर होती.
1998 मध्ये प्रथम यूएस ओपन खेळणारी सेरेना 1999 मध्ये विजेती ठरली. त्यानंतर 2002, 2008, 2012, 2013 आणि 2014 मध्ये तिने विजेतेपद जिंकले. गतवर्षी विम्बल्डन ओपनच्या अंतिम सामन्यात तिला सिमोना हालेप विरुद्ध पराभव पत्करावा लागला.