हैदराबाद - भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने दोन वर्षांनंतर पुनरागमन करताना, होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धचे विजेतेपद पटकावले. ३३ वर्षीय सानियाने आपली युक्रेनची जोडीदार नादिया किचेनोक हिच्यासह खेळताना, कारकिर्दीतील ४२ वा डब्ल्यूटीए किताब जिंकला. दरम्यान, मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
सानिया-नादिया या जोडीने आज (शनिवार) महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत झांग शुई आणि पेंग शुई या चीनच्या जोडीचा पराभव केला. १ तास २१ मिनिटे रंगलेल्या सामन्यात सानिया-नादिया या जोडीने ६-४, ६-४ ने पराभव केला.
सानियाने ऑक्टोबर २०१७ मध्ये अखेरची चीन ओपन स्पर्धा ही खेळली होती. त्यानंतर ती दुखापत आणि गरोदरपणामुळे दोन वर्ष टेनिसपासून लांब होती. दरम्यान, सानियाने २०१३ मध्ये एकेरीतून निवृत्ती घोषित केली आहे.
हेही वाचा - लाडक्या लेकासोबत सानिया मिर्झाचा क्युट अंदाज, पाहा फोटो
हेही वाचा - लग्नाच्या बंधनात अडकणार टेनिसचा बादशाहा, नदालसाठी सोडली होती 'तिने' नोकरी..