मुंबई - भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने, कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी १.२५ करोड रुपयाची रक्कम जमवली आहे. सानिया ही रक्कम गरजूंना देणार आहे. संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात गरजूंना मदत लागेल, त्यांच्यासाठी ही रक्कम कामी येईल. किमान १ लाख लोकांना या रकमेमुळे सहायता मिळेल, असे सानियाने म्हटलं आहे.
सानियाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. ती म्हणते की, 'गरजूंना सहायता करण्यासाठी, आम्ही मागील आठवड्याभरात एक टीमच्या माध्यमातून प्रयत्न केला. यात आम्ही हजारो लोकांना जेवण दिलं. याबरोबर आम्ही १.२५ करोड इतकी रक्कम जमवली. जी किमान एक लाख लोकांसाठी उपयोगी ठरेल. हा एक छोटासा प्रयत्न होता. आपल्याला एकजूट होऊन अशा गोष्टी कराव्या लागणार आहेत.'
-
The last week we have tried as a team to provide some help to the people in need..we provided food to thousands of families and raised 1.25 Crore in one week which will help close to 1 Lakh people.its an ongoing effort and we are in this together 🙏🏽@youthfeedindia @safaindia pic.twitter.com/WEtl1ebjVR
— Sania Mirza (@MirzaSania) March 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The last week we have tried as a team to provide some help to the people in need..we provided food to thousands of families and raised 1.25 Crore in one week which will help close to 1 Lakh people.its an ongoing effort and we are in this together 🙏🏽@youthfeedindia @safaindia pic.twitter.com/WEtl1ebjVR
— Sania Mirza (@MirzaSania) March 30, 2020The last week we have tried as a team to provide some help to the people in need..we provided food to thousands of families and raised 1.25 Crore in one week which will help close to 1 Lakh people.its an ongoing effort and we are in this together 🙏🏽@youthfeedindia @safaindia pic.twitter.com/WEtl1ebjVR
— Sania Mirza (@MirzaSania) March 30, 2020
सानियाच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. एका चाहत्याने तिला, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तु आपले प्रयत्न सुरू ठेव, असे म्हटलं आहे. तर सानियाचे सासर पाकिस्तानमधूनही तिचे कौतूक होत आहे.
सानियाने याआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती 'सफा' सामाजिक संस्थेला समर्थन करत, कठीण काळात रोजंदारी मजूरांना मदत करण्याचे, आवाहन केलं आहे.
हेही वाचा - Corona Virus Lockdown : क्रिकेटपटूंवर आली घरकाम करण्याची वेळ, आता बुमराहचा व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी महिला क्रिकेटपटू सरसावल्या, मितालीसह यांनी दिली मदत