ETV Bharat / sports

इटालियन ओपन : अंतिम फेरीच्या तिकीटासाठी स्टेफानोस आणि नदाल आमने-सामने

उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालने आपलाच देशवासी असलेला फर्नांडो व्हेर्डास्कोला ६-४, ६-० ने पराभूत करत उपांत्य फेरी गाठली

author img

By

Published : May 17, 2019, 11:08 PM IST

अंतिम फेरीच्या तिकीटासाठी स्टेफानोस आणि नादाल आमने-सामने

रोम - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल आणि ग्रीसचा स्टेफानो त्सित्सिपास इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आमने-सामने येणार आहेत. या सामन्यातील विजेता खेळाडू स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीत २० ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर सामना खेळू न शकल्याने स्टेफानो त्सित्सिपासला सरळ उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले. तर दुसरीकडे राफेल नदालने आपलाच देशवासी असलेला फर्नांडो व्हेर्डास्कोला ६-४, ६-० ने पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.

२० वर्षीय स्टेफानोने यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये रॉजर फेडररला पराभवाचा धक्का देत मोठा उलटफेर केला होता. त्यामुळे नदालला इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहचायचे असल्यास स्टेफानोविरुद्ध सावध खेळ करावा लागणार आहे.

Intro:Body:

Spo 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.