ETV Bharat / sports

राफेल नदालची यूएस ओपनमधून माघार - नदालची यूएस ओपनमधून माघार

यापूर्वी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टीनेही यूएस ओपन खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. तर, निक किर्गिओसनेही या स्पर्धेत भाग न घेण्याची घोषणा केली होती. ही स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

rafael nadal pulls out of us open 2020
राफेल नदालची यूएस ओपनमधून माघार
author img

By

Published : Aug 5, 2020, 11:39 AM IST

न्यूयॉर्क - गतविजेता टेनिसपटू राफेल नदालने यंदाच्या यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. या निर्णयामुळे त्याने रॉजर फेडररच्या ग्रँडस्लॅम विक्रमाला मागे टाकण्याच्या आपल्या दाव्यांनाही ब्रेक दिला आहे. "जगभरात परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आहे, कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. या व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही", असे नदालने सांगितले.

यापूर्वी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टीनेही यूएस ओपन खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. तर, निक किर्गिओसनेही या स्पर्धेत भाग न घेण्याची घोषणा केली होती. ही स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

कोरोनाकाळात अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आयोजित केलेल्या अ‌ॅड्रिन टेनिस टूर स्पर्धेवर किर्गिओसने टीका केली होती. या स्पर्धेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये स्थान देण्यात आले होते. तर, नोव्हाक जोकोविचसह आघाडीच्या टेनिसपटूंना कोरोनाची लागण झाली होती.

यावर्षी रॉजर फेडररसुद्धा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे यूएस ओपनमध्ये खेळणार नाही. १९९९च्या यूएस ओपन स्पर्धा नदाल आणि रॉजर फेडररशिवाय खेळली गेली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.