नवी दिल्ली - जागतिक क्रमवारीत नं.१ असणाऱ्या टेनिसपटू नोवाक जोकोविचला अमेरिकेतील यूएस ओपन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. उपउपांत्य फेरीच्या आधीच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे त्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे.
हेही वाचा - जे कोणत्याही भारतीयाला जमले नाही ते मलिंगाने करुन दाखवले
हा सामना जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टेन वाँवारिका यांच्यात सुरु होता. सामन्याच्या तिसऱ्या से़टमध्ये जोकोविचला खांद्य़ाची दुखापत झाली. त्यामुळे त्याने पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला. जोकोविच बाहेर पडल्यामुळे वाँवारिकाला पुढच्या सामन्यासाठी थेट प्रवेश मिळाला आहे.
जोकोविचने या सामन्यातील पहिले दोन सेट गमावले होते. जेव्हा त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा वाँवारिकाने सामन्यात ६-४, ७-५, २-१ ने आघाडी घेतली होती. मागच्या एका वर्षात जोकोविचने पाचपैकी चार ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले आहेत. यावर्षी त्याने ऑस्ट्रेलिया ओपन आणि मागील वर्षी यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते.