ETV Bharat / sports

जोकोव्हिचची रंगतदार लढतीत बाजी, जिंकली आठव्यांदा ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा - ऑस्ट्रेलिया ओपन २०२०

सर्बियाच्या स्टार खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Novak Djokovic wins record-extending eighth Australian Open title with dramatic five-sets win over Dominic Thiem
जोकोव्हिचची रंगतदार लढतीत बाजी, जिंकली आठव्यांदा ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा
author img

By

Published : Feb 2, 2020, 6:43 PM IST

Updated : Feb 2, 2020, 7:34 PM IST

न्यूयॉर्क - सर्बियाच्या स्टार खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पाच सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचने 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 अशी मारली. अंतिम सामन्यात जोकोव्हिचने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमचा धुव्वा उडवत विजेतेपदावर नाव कोरले. दरम्यान, जोकोव्हिचचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे आठवे विजेतेपद ठरले.

अंतिम सामना रंगतदार ठरला. पहिला सेट जोकोव्हिचने ६-४ असा आरामात जिंकला. तेव्हा थिएमने दुसरा आणि तिसरा सेट जिंकत सामन्यात रंगत आणली. त्याने दुसरा सेट ६-४ तर तिसरा सेट ६-२ ने जिंकला.

चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचने शानदार पुनरागमन केले. त्याने हा सेट ६-३ असा जिंकत सामना निर्णायक सेटमध्ये पोहोचवला. निर्णायक सेट रंगतदार होईल, असे वाटत असताना जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावत पाचव्या सेटमध्ये ६-३ अशी बाजी मारली आणि या सेटसह त्याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

दरम्यान, जोकोव्हिचचे ऑस्ट्रेलिया ओपनचे हे आठवे विजेतेपद आहे. याआधी त्याने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६ आणि २०१९ मध्ये या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जोकोव्हिचने आपल्या कारकिर्दीतील १७ वा ग्रँडस्लॅम खिताब जिंकला आहे.

हेही वाचा - अमेरिकेच्या सोफियाला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : क्रिस्टिना-टिमियाने पटकावले महिला दुहेरीचे जेतेपद

Intro:Body:

spo

Conclusion:
Last Updated : Feb 2, 2020, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.