नवी दिल्ली - जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाकाने आपली प्रतिस्पर्धी अमेरिकेची टेनिस दिग्गज सेरेना विल्यम्सला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. 22 वर्षीय ओसाकाने मागील वर्षी सेरेनापेक्षा 1.4 कोटी डॉलर्सची जादा कमाई केली.
फोर्ब्स मासिकानुसार, ओसाकाने गेल्या 12 महिन्यांत 3 कोटी 74 लाख डॉलर्सची कमाई केली आहे. पुरस्कार आणि जाहिरातींमधून ओसाकाने सेरेनापेक्षा 14 लाख डॉलर्स जास्त कमावले आहेत.
तथापि, या दोघांनी मारिया शारापोव्हाचा एका वर्षात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम मोडला. शारापोव्हाने 2015 मध्ये 2 कोटी 97 लाख डॉलर्सची कमाई केली होती.
जपानची अव्वल महिला टेनिस खेळाडू नाओमी ओसाकाने मागील वर्षी घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवले आहे. ओसाकाने पॅन पॅसिफिक जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऍनास्ताशिया पॅव्हलिउचेन्कोवाचा सहज पराभव करत जेतेपद पटकावले होते.