ETV Bharat / sports

टेनिस : नाओमी ओसाका आणि सिमोना हॅलेप माद्रीद ओपनच्या दुसऱ्या फेरीत दाखल - enter in second round

ओसाकाने स्लोवाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाचा 6-2, 7-6 असा सरळ सेटमध्ये केला पराभव

नाओमी ओसाका आणि सिमोना हॅलेप
author img

By

Published : May 6, 2019, 9:15 PM IST

स्पेन (माद्रीद) - डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली जपानची महिला टेनिस खेळाडू नाओमी ओसाका आणि रोमानियाच्या सिमोना हॅलेपने माद्रिद ओपनमध्ये महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

पहिल्या फेरीत ओसाकाने स्लोवाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाचा 6-2, 7-6 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या फेरीत ओसाकाचा सामना स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोशी होईल. साराने आपल्याच देशाची खेळाडू लारा अरुबारेनाला 6-4, 3-6, 6-1 असे पराभूत केले होते.

माजी अग्रमानांकित चेक गणराज्यच्या मार्गरिटा गासपारयानला 6-0, 6-4 ने मात करत सिमोना हॅलेपनेही दुसऱ्या फेरीत मजल मारली. अंतिम 32 मध्ये सिमोनाचा सामना योहाना कोंटाशी होईल. कोंटाने अमेरीकेच्या एलीसन रिस्कीला 6-4, 6-1 अशी मात दिली होती.

Intro:Body:

Spo news 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.