ETV Bharat / sports

नदालने १२व्यांदा जिंकली बार्सिलोना ओपन स्पर्धा - barcelona open 2021 final

राफेल नदालने स्टेफानोस सिटसिपासचा अंतिम सामन्यात पराभव करत १२व्यांदा बार्सिलोना ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

nadal-won-the-barcelona-open-for-the-12th-time-by-defeating-sitsipas
नदालने १२व्यांदा जिंकली बार्सिलोना ओपन स्पर्धा
author img

By

Published : Apr 26, 2021, 4:10 PM IST

बार्सिलोना - स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदाल याने त्याचे 'किंग ऑफ क्ले कोर्ट' हे बिरूद सार्थ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. नदालने बार्सिलोना ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टेफानोस सिटसिपास याचा ६-४, ६-७, ७-५ ने पराभव करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या इतिहासातील नदालचे हे १२वे विजेतेपद ठरले.

  • Rafael Nadal as Barcelona champions it's...

    🐂 87th career's title
    🐂 61st title on clay
    🐂 12th in Barcelona
    ✌ Back as World Number 2 pic.twitter.com/BqVmmfYRBQ

    — We Are Tennis (@WeAreTennis) April 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नदाल आणि सिटसिपास यांच्यातील सामना रोमांचक ठरला. तब्बल तीन तास ३८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात नदालने बाजी मारली. हा सामना एटीपीच्या अंतिम सामन्यात सर्वात जास्त वेळ लांबलेला तिसरा सामना आहे. पहिला सेट नदालने ६-४ ने एकतर्फा जिंकला. यानंतर सिटसिपासने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले आणि हा सेट ७-६ ने जिंकला. अखेरच्या निर्णायक सेटमध्ये नदालने ७-५ अशी बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरलं.

हेही वाचा - DC VS SRH : सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय, हैदराबादचा चौथा पराभव

हेही वाचा - IPL २०२१ : 'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात', अश्विनची आयपीएलमधून माघार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.