माद्रिद - बेलारूची स्टार टेनिसपटू अरिना सबालेंका हिने अनास्तासिया पावलिउचेंकोवा हिचा ६-२, ६-३ अशा फरकाने पराभव करत माद्रिद ओपनची अंतिम फेरी गाठली आहे.
सबालेंका हिचा सामना आता अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या अश्ले बार्टी हिच्याशी होणार आहे. बार्टीने पाउला बादोसा हिचा उपांत्य फेरीत ६-४, ६-३ ने धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
अंतिम फेरी गाठल्यानंतर सबालेंका म्हणाली की, 'क्ले कोर्टवर खेळताना माझ्या खेळामध्ये खूप सुधारणा झाली आहे. असे मला वाटतं. यामुळे निश्चितच माझा आत्मविश्वास वाढेल. पण अद्याप आणखी काही बाबींवर काम करण्याची आवश्यकता आहे. माद्रिद ओपनमधील कामगिरीवर मी खूश आहे.'
सबालेंकाने सहा वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या पावलिउचेंकोवा हिचा एका तासात पराभव केला. तिने २१ विनर्स लगावले. तर ११ अफोर्ड एरर केले.
हेही वाचा - मेड्रिड ओपन : नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का
हेही वाचा - मॅड्रिड ओपन : थीम, रूबलेवचा विजय