टोकियो (जपान) - जागतिक टेनिस पुरुष क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या नोव्हान जोकोव्हिचने पहिल्यांदाच जपान ओपन स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जपानची राजधानी टोकियो येथे खेळवण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियाचा जॉन मिलमनचा पराभव केला. दरम्यान, जोकोव्हिचचे हे कारकीर्दीतील ७६ वे विजेतेपद ठरले आहे.
आज रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जोकोव्हिचने जॉनचा ६-३, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोव्हिचने या सामन्यात एकही सेट न गमावता अवघ्या ६९ मिनिटात विजयावर मोहोर लावली.
![japan open 2019 : novak djokovic defeated john millman to win japan open 2019](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4672349_jjjjj.jpg)
हेही वाचा - VIDEO: नोव्हान जोकोव्हीच २५० किलो सुमो पैलवानशी पंगा घेतो, तेव्हा..
दरम्यान, जोकोव्हिचला नुकतीच पार पडलेल्या युएस ओपन स्पर्धेमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे जोकोव्हिचने या स्पर्धेच्या चौथ्या फेरीतून माघार घेतली होती. यानंतर जोकोव्हिच जपान ओपनच्या रुपाने पहिलीच स्पर्धा खेळत होता. ती स्पर्धा जिंकत त्याने टेनिस कोर्टावर दमदार पुनरागमन केले आहे.
हेही वाचा - जपान ओपन : घरच्या मैदानावर ओसाकाने मिळवले विजेतेपद