ETV Bharat / sports

ग्रेट कमबॅक! सचिन, लक्ष्मणने केलं जोकोव्हिचचं कौतूक - नोवाक जोकोव्हिच न्यूज

सार्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावत फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याच्या झुंजार खेळीचे कौतूक भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी केलं आहे.

'Great comeback': Sachin Tendulkar, VVS Laxman laud Novak Djokovic's dramatic French Open title win
ग्रेट कमबॅक! सचिन, लक्ष्मणने केलं जोकोव्हिचचं कौतूक
author img

By

Published : Jun 14, 2021, 4:17 PM IST

मुंबई - अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतर सार्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचने आपला अनुभव पणाला लावत पुढील तीन सेट जिंकत फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याच्या या झुंजार खेळीचे कौतूक भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी केलं आहे.

सचिन आणि लक्ष्मण यांनी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना संपल्यानंतर आपापल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहेत. यात सचिनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'अप्रतिम अंतिम सामना. अवघड सामन्यानंतरही जोकोव्हिचने उत्कृष्ट पुनरागमन केले. तो खेळाच्या दृष्टिकोनातून, तसेच शारिरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कणखर होता. या गोष्टीमुळेच तो अंतिम सामना जिंकू शकला.'

  • WHAT A FINAL!🤯

    Great comeback by Novak after some tough matches.

    He was physically strong, tactically smart & mentally tough..that’s where he won the Final.

    Amazing game by @steftsitsipas & I’m sure he’ll win a handful of Grand Slams in the years to come.#RolandGarros pic.twitter.com/XWFqMLXucK

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) June 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुढे सचिनने त्सीत्सीपासचे कौतूक करताना म्हटलं की, त्सीत्सीपासनेही उत्तम खेळ केला. भविष्यात तो बऱ्याच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकेल याची खात्री आहे.

१९ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावल्याबद्दल नोवाक जोकोव्हिचचे अभिनंदन. पहिले दोन सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करणे आणि सामना जिंकणे, या गोष्टी तो मानसिकदृष्ट्या किती कणखर आहे आणि त्याच्यात किती आत्मविश्वास आहे, हे दाखवतात. तो खरा चॅम्पियन आहे, अशा आशयाचे ट्विट लक्ष्मणने केलं आहे.

  • Many congratulations to Novak Djokovic on winning his 19th grand slam . To comeback after trailing ,and win the way he did just showed the immense self belief and mental toughness. True Champion #frenchopenfinal pic.twitter.com/rCcxIi1KvG

    — VVS Laxman (@VVSLaxman281) June 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतर जोकोव्हिचने दमदार पुनरागमन करत ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासचा ६-७, २-६, ६-३, ६-२, ६-४ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. त्याचे हे कारकिर्दीतील १९ वे ग्रँडस्लॅम आहे.

हेही वाचा - नोवाक जोकोव्हिचने पटकावलं फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद

हेही वाचा - विनू मांकड, संगकारासह १० खेळाडूंना ICC Hall of Fame मध्ये स्थान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.