पॅरिस - अमेरिकेची चौथी मानांकित सोफिया केनिनने फ्रेंच ओपन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. केनिनचा या स्पर्धेतील अंतिम सामना पोलंडच्या इगा स्वितेकशी होईल. यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणार्या केनिनने सातव्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाचा ६-६, ७-५ असा पराभव केला. या हंगामात केनिनचा ग्रँडस्लॅम रेकॉर्ड १६-१ असा आहे.
-
Welcome to the final 👏
— Roland-Garros (@rolandgarros) October 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
19-year-old @iga_swiatek dominates Podoroska 6-2 6-1 to become the first 🇵🇱 woman in the Open Era to reach the title match in Paris.#RolandGarros pic.twitter.com/48CIv1C8vO
">Welcome to the final 👏
— Roland-Garros (@rolandgarros) October 8, 2020
19-year-old @iga_swiatek dominates Podoroska 6-2 6-1 to become the first 🇵🇱 woman in the Open Era to reach the title match in Paris.#RolandGarros pic.twitter.com/48CIv1C8vOWelcome to the final 👏
— Roland-Garros (@rolandgarros) October 8, 2020
19-year-old @iga_swiatek dominates Podoroska 6-2 6-1 to become the first 🇵🇱 woman in the Open Era to reach the title match in Paris.#RolandGarros pic.twitter.com/48CIv1C8vO
स्वितेकने अर्जेटिनाच्या नादिया पोड्रोस्काचा ६-२, ६-१ असा पराभव केला. १९ वर्षीय स्वितेक सध्या ५४व्या क्रमांकावर आहे. ती याआधी कोणत्याही ग्रँडस्लॅममध्ये चौथ्या फेरीच्या पुढे गेली नाही. या स्पर्धेत ती महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती सर्वात कमी क्रमवारी असणारी खेळाडू ठरली आहे. ती म्हणाली, "हे एका स्वप्नासारखे आहे. मी अंतिमपर्यंत पोहोचू शकेन असा विचारही केला नव्हता."
स्वितेकने या स्पर्धेच्या चौथ्या फेरीत सिमोना हालेपचा ६-१, ६-२ असा पराभव केला. तिने महिला दुहेरीतही अमेरिकेच्या निकोल मॅलेसरसह उपांत्य फेरी गाठली आहे. तिने ही दोन्ही पदके जिंकल्यास, ती फ्रेंच ओपन एकेरी व महिला दुहेरी जिंकणारी मेरी पियर्सनंतर (२०००) पहिली खेळाडू ठरेल.