ETV Bharat / sports

प्रेक्षकांशिवाय होणार यंदाची फ्रेंच ओपन स्पर्धा? - latest news about French open 2020

स्पर्धा सुरू होण्याची तारीख 20 सप्टेंबरची होती, परंतु 27 सप्टेंबरपासून या स्पर्धेचे आयोजन करता येईल, असे गुईडसेली यांनी सांगितले.

French open 2020 may be held in an empty stadium
प्रेक्षकांशिवाय होणार यंदाची फ्रेंच ओपन स्पर्धा?
author img

By

Published : May 11, 2020, 8:34 AM IST

पॅरिस - यंदाची फ्रेंच ओपन स्पर्धा प्रेक्षकांशिवाय आयोजित होऊ शकेल, असे फ्रान्स टेनिस महासंघाचे अध्यक्ष (एफएफटी) बर्नार्ड गुइडिसेली यांचे म्हणणे आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेची स्थगिती प्रथम मार्चमध्ये जाहीर केली गेली होती. त्यानंतर, फ्रान्समध्ये लॉकडाऊन सुरू झाले.

गुईडसेली यांनी सांगितले, “आम्ही कोणताही पर्याय नाकारला नाही. जगभरातील कोट्यावधी लोक या स्पर्धेची प्रतीक्षा करत आहेत. रिकाम्या स्टेडियममध्ये ही स्पर्धा घेऊन, व्यावसायिक मॉडेलचा एक भाग- टीव्ही हक्क (स्पर्धेच्या उत्पन्नाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त भाग) चालूच राहील. याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही."

स्पर्धा सुरू होण्याची तारीख 20 सप्टेंबरची होती, परंतु 27 सप्टेंबरपासून या स्पर्धेचे आयोजन करता येईल, असे गुईडसेली यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसमुळे सर्व प्रकारचे क्रीडा क्रियाकलाप ठप्प झाले आहेत. विम्बल्डन स्पर्धा 2020 रद्द करण्यात आली आहे. 1945 नंतर विम्बल्डन रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा 29 जून ते 12 जुलै दरम्यान खेळली जाणार होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.