ETV Bharat / sports

पोलंडची १९ वर्षीय इगा ठरली 'फ्रेंच सम्राज्ञी'; अमेरिकेच्या केनिनचा पराभव - Iga Swiatek french open women's 2020 winner

पोलंडची युवा टेनिसपटू इगा स्वियातेक हिने फ्रेंच ओपन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिने अंतिम सामन्यात अमेरिकाच्या सोफिया केनिनचा ६-४, ६-१ असा सलग दोन सेटमध्ये धुव्वा उडवला.

french-open-2020-iga-swiatek-wins-french-open-becomes-first-pole-to-win-grand-slam-singles-title
french-open-2020-iga-swiatek-wins-french-open-becomes-first-pole-to-win-grand-slam-singles-title
author img

By

Published : Oct 11, 2020, 1:51 PM IST

Updated : Oct 11, 2020, 2:39 PM IST

पॅरिस - पोलंडची युवा टेनिसपटू इगा स्वियातेक हिने फ्रेंच ओपन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. शनिवारी झालेल्या सामन्यात १९ वर्षीय इगाने अमेरिकेच्या सोफिया केनिनचा सलग दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. इगाचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम आहे. तसेच इगा ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरणारी पोलंडची पहिली टेनिसपटू ठरली.

इगाने अंतिम सामन्यात केनिनवर ६-४, ६-१ अशी मात केली. या वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या केनिनकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा होती. पण सुरुवातीचा काही खेळ वगळता इगाचेच संपूर्ण सामन्यात वर्चस्व दिसले. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात अवघे २३ गेम गमावणाऱ्या इगाने केनिनविरुद्ध सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले.

पहिल्या सेटमध्ये दोघींनी चांगला खेळ केला. एकवेळ पहिला सेट ४-४ अशा स्थितीत असताना इगाने केनिनची स‌र्व्हिस भेदत पहिला सेट जिंकला. मात्र दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच केनिनने पुनरागमन केले. पहिल्याच गेममध्ये इगाची सर्व्हिस मोडीत काढत केनिनने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर इगाने शानदार पुनरागमन केले. तिने केनिनच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत पुढील सहा गेम जिंकून दुसऱ्या सेटसह विजेतेपदावर नाव कोरले. या दरम्यान इगाने केनिनची तीन वेळा सर्व्हिस भेदली.

हेही वाचा - फ्रेंच ओपन २०२० : विजेतेपदासाठी नदाल-जोकोव्हिच यांच्यात आज लढत

Last Updated : Oct 11, 2020, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.