पॅरिस - फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. दरवर्षी मे महिन्यामध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सप्टेंबरमध्ये होत आहे. महत्वाची बाब म्हणजे, ही स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. पण, मोजकेच प्रेक्षक मैदानावर सामना पाहू शकणार आहेत. दरम्यान, महिना बदलल्याने थंड वातावरणात सुरू होणाऱ्या या लाल मातीवरील स्पर्धेत नवा अनुभव पाहायला मिळणार आहे.
-
Raise the roof 🙌 Welcome to a new chapter in #RolandGarros history...
— Roland-Garros (@rolandgarros) September 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2020, la renaissance d'un court de légende. pic.twitter.com/3mWk8O13ZQ
">Raise the roof 🙌 Welcome to a new chapter in #RolandGarros history...
— Roland-Garros (@rolandgarros) September 24, 2020
2020, la renaissance d'un court de légende. pic.twitter.com/3mWk8O13ZQRaise the roof 🙌 Welcome to a new chapter in #RolandGarros history...
— Roland-Garros (@rolandgarros) September 24, 2020
2020, la renaissance d'un court de légende. pic.twitter.com/3mWk8O13ZQ
आजपासून सुरू होणारी ही स्पर्धा ११ ऑक्टोबरपर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९८१ मध्ये फ्रेंच क्ले कोर्ट चॅम्पियनशीप या नावाने करण्यात आली होती. लाल मातीवरील 'बादशाह' अशी ओळख असलेल्या स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने तब्बल १२ वेळ ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत नदालला अग्रमानांकित सर्बियाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचचे मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय या दोघांना गेल्या दोन फ्रेंच स्पर्धामध्ये उपविजेतेपद मिळवणारा ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिमचे कडवे आव्हान आहे.
महिलांमध्ये रोमानियाच्या सिमोना हालेपकडून अपेक्षा आहेत. हालेपने नुकतीच लाल मातीवरील इटली स्पर्धा जिंकत लयीत असल्याचे दाखवले आहे. गतविजेती ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी आणि अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणारी जपानची नाओमी ओसाका या दोघी नसल्याने हालेपला जेतेपद पटकवण्याची चांगली संधी आहे. पण तिच्यापुढे अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका या दोन अनुभवी खेळाडूंचे आव्हान आहे. दुसरीकडे सेरेना विक्रमी २४ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. दरम्यान २०१८ मध्ये हालेपने फ्रेंच खुली स्पर्धा जिंकली होती.
हेही वाचा - फ्रेंच ओपन पात्रता फेरीपूर्वी महिला टेनिसपटूला कोरोनाची लागण
हेही वाचा - हालेपने जिंकले महिलांच्या इटालियन ओपनचे विजेतेपद