ETV Bharat / sports

जोकोविचला माद्रिद ओपनचे जेतेपद; स्टेफिनोवर ६-३, ६-४ ने केली मात - federer

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचने पहिल्या सेटमधील स्टेफिनोची सर्व्हिस ब्रेक करत २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर जोकोविचने अखेरपर्यंत हा सेट ६-३ ने जिंकला.

जोकोविचला माद्रिद ओपनचे जेतेपद
author img

By

Published : May 13, 2019, 6:29 PM IST

माद्रिद - अग्रमानांकित खेळाडू सर्बियाच्या नोवाक जोकोविचने माद्रिद ओपनचे जेतेपद पटकावले. जोकोविचने ग्रीसच्या स्टेफिनो त्सित्सिपासवर ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचने एटीपी १००० चे ३३वे पदक जिंकले आहे. एकूण एटीपीचे ७४ किताब जिंकला आहे.

जोकोविचला माद्रिद ओपनचे जेतेपद
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचने पहिल्या सेटमधील स्टेफिनोची सर्व्हिस ब्रेक करत २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर जोकोविचने अखेरपर्यंत हा सेट ६-३ ने जिंकला. दुसऱ्यासेटमध्ये स्टेफिनो पुनरागमनासाठी झगडत होता, मात्र जोकोविचने आपल्या अनुभवाचा फायदा घेत स्टेफिनोला पुनरागमनाची संधीच दिली नाही.क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदालला उपांत्य फेरीत स्टेफिनोने धक्कादायक पराभव केला होता. स्टेफिनो पुन्हा एकदा अंतिम सामन्यात जोकोविचला धक्का देत किताब जिंकेल अशी आशा होती. मात्र जोकोविचपुढे त्याचा निभाव लागला नाही. जोकोविच सध्या भन्नाट फार्मात आहे. जोकोविचने स्टेफिनोला विजयाची एकही संधी दिली नाही.

Intro:Body:

state 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.