न्यूयॉर्क - भारताचा आघाडीचा पुरुष दुहेरीपटू दिविज शरण आणि त्याचा जोडीदार न्यूझीलंडचा आर्टेम सिताक न्यूयॉर्क ओपनमधून बाहेर पडले आहेत. अमेरिकेच्या स्टीव्हन जॉनसन आणि रॅली ओपेलका विरुद्ध शरण आणि सिताक यांच्या जोडीला ३-६, ४-६ अशा सरळ सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा - टीम इंडियाची न्यूझीलंड भ्रमंती, 'या' खेळाडूने शेअर केले अनुष्कासोबतचे फोटो
शरण-सिताक जोडीने अमेरिकेच्या ऑस्टिन क्राइजेक आणि क्रोएशियाच्या फ्रांको स्कूगर या जोडीला मात देत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. एक तास १९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात शरण-सिताक जोडीने त्यांचा ७-६, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.