ETV Bharat / sports

अस्ताना ओपन : टेनिसपटू दिविज शरण उपांत्यपूर्व फेरीत - astana open 2020 news

शरण-बॉम्ब्रिजने उरुग्वेचा एरियल बेहार आणि इक्वाडोरच्या गोंझालो एस्कोबारचा पराभव केला. एक तास आणि ३० मिनिटे रंगलेल्या हा सामना शरण-बॉम्ब्रिजने ७-५, ४-६, १०-६ असा जिंकला.

Divij sharan and bombridge in the quarter-finals of the astana open
अस्ताना ओपन : टेनिसपटू दिविज शरण उपांत्यपूर्व फेरीत
author img

By

Published : Oct 30, 2020, 3:30 PM IST

नूर सुलतान - भारताचा टेनिसपटू दिविज शरण आणि त्याचा ग्रेट ब्रिटनचा साथीदार ल्यूक बॉम्ब्रिज यांनी अस्ताना ओपन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. शरण-बॉम्ब्रिजने उरुग्वेचा एरियल बेहार आणि इक्वाडोरच्या गोंझालो एस्कोबारचा पराभव केला. एक तास आणि ३० मिनिटे रंगलेल्या हा सामना शरण-बॉम्ब्रिजने ७-५, ४-६, १०-६ असा जिंकला.

पुढील फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाची जोडी मॅक्स पर्सल आणि ल्यूक सेव्हिले यांच्याशी होईल. दुसर्‍या फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या फ्रान्सिस टिफोने दुसऱ्या मानांकित सर्बियाच्या मियोमिर केस्मानोव्हिकचा ७-५, ६-३ असा पराभव केला. हा सामना एक तास २० मिनिटे चालला.

अमेरिकेच्या टॉमी पॉलने मोलडोवाच्या राडू अल्बॉटचा ६-६, ६-० असा पराभव केला. तर, बेलारूसच्या इगोर गेरासीमोव्हने जिरी वेसेलेचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.