मुंबई - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे खेळाडूंचे घरबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. याकारणाने खेळाडूंना सरावही करता येत नसल्याचे समोर आले आहे. पण यावर टेनिस विश्वातील दिग्गज रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांनी उपाय शोधून काढला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सराव कसा करता येतो, याचा उत्तम नमुना तिघांनी पेश केला आहे. तिघांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सरावाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. यात फेडरर आणि नदाल आपापल्या घराच्या परिसरात टेनिस खेळताना दिसत आहेत. तर जोकोव्हिच चक्क घरात सराव करताना पाहायला मिळत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फेडररने सरावाचा व्हिडीओ शेअर करताना, भारताचा कर्णधार विराट कोहली, नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल यांना टॅग केले आहे. या तिघा दिग्गजांनी एकूण ५६ ग्रँडस्लॅम जिंकली आहेत. ज्यात फेडरर २०, नदाल १९ आणि जोकोव्हिचच्या १७ किताबाचा समावेश आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, सध्याच्या घडीला बरेच खेळाडू घरीच बसलेले पाहायला मिळतात. काही खेळाडू व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळत आहेत. तर काही खेळाडू सोशल मीडियाद्वारे लोकांना आवाहन करत आहे, तर काही खेळाडू रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - रशियन टेनिससुंदरीने शेअर केला स्वत: चा फोन नंबर, चाहत्यांची उडाली झुंबड!
हेही वाचा -भारतीय खेळाडूने निवडला भारत-पाकचा सर्वोत्तम कसोटी संघ, पाक खेळाडूकडे नेतृत्व