ETV Bharat / sports

बियांका अँड्रेस्क्युची फ्रेंच ओपनमधून माघार - फ्रेंच ओपन २०२० न्यूज

बियांकाच्या आधी ऑस्ट्रेलियाची एश्ले बार्टी आणि जपानची नाओमी ओसाका यांनीही फ्रेंच ओपन न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बियांका म्हणाली, "यावेळी मी न खेळण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. मी उर्वरित हंगामात विश्रांती घेईन आणि माझ्या आरोग्यावर आणि प्रशिक्षणाकडे लक्ष देईन."

bianca andreescu withdraws from french open 2020
बियांका अँड्रेस्क्युची फ्रेंच ओपनमधून माघार
author img

By

Published : Sep 23, 2020, 3:06 PM IST

नवी दिल्ली - जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेली कॅनडाची महिला टेनिसपटू बियांका अँड्रेस्क्युने ग्रँडस्लॅम स्पर्धा फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. बियांका उर्वरित सत्रामध्ये विश्रांती घेणार असून ती तिच्या आरोग्याकडे आणि प्रशिक्षणाकडे लक्ष देणार आहे.

बियांका म्हणाली, "यावेळी मी न खेळण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. मी उर्वरित हंगामात विश्रांती घेईन आणि माझ्या आरोग्यावर आणि प्रशिक्षणाकडे लक्ष देईन." बियांकाने यूएस ओपनमध्येही सहभाग घेतला नव्हता. गेल्या वर्षी शिनझेन येथे खेळल्या गेलेल्या डब्ल्यूटीए फायनल्समध्ये ती खेळली आणि तेव्हापासून ती कोर्टात परतली नाही. यावर्षी तिने जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही भाग घेतला नव्हता.

"या निर्णयापर्यंत पोहोचणे खूप कठीण होते. २०२१ मध्ये मला बरेच काम करायचे आहे. हा वेळ मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरू इच्छिते, जेणेकरून मी पुनरागमन करू शकेन", असेही तिने सांगितले.

बियांकाच्या आधी ऑस्ट्रेलियाची एश्ले बार्टी आणि जपानची नाओमी ओसाका यांनीही फ्रेंच ओपन न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.