मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिला एकेरी गटातील दुसऱ्या फेरीत बुधवारी उलटफेर पाहायला मिळाला. तैवानच्या हसीह सू वेई हिने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या बियांकाला पराभूत केले. हसीह हिने बियांकाविरुद्धचा सामना ६-३, ६-२ अशा फरकाने जिंकला.
बियांकाने २०१९ मध्ये अमेरिका ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सला धूळ चारत विजेतेपद पटकावले होते. यानंतर ती २०२० मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे, काही काळ टेनिसपासून लांब होती.
-
💪 Giant-killer Su-Wei Hsieh sure loves the big stage.
— #AusOpen (@AustralianOpen) February 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Converting her third match point, Hsieh def. 8th seed Andreescu 6-3 6-2 #AusOpen | #AO2021 pic.twitter.com/2N0EuknOsK
">💪 Giant-killer Su-Wei Hsieh sure loves the big stage.
— #AusOpen (@AustralianOpen) February 10, 2021
Converting her third match point, Hsieh def. 8th seed Andreescu 6-3 6-2 #AusOpen | #AO2021 pic.twitter.com/2N0EuknOsK💪 Giant-killer Su-Wei Hsieh sure loves the big stage.
— #AusOpen (@AustralianOpen) February 10, 2021
Converting her third match point, Hsieh def. 8th seed Andreescu 6-3 6-2 #AusOpen | #AO2021 pic.twitter.com/2N0EuknOsK
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २० वर्षीय बियांकाला ३५ वर्षीय सू-वेई हिने पराभवाचा धक्का दिला. बियांकाला आपल्या खराब सर्विसचा फटका बसला. यात त्याने आपल्या दुसऱ्या सर्विसमध्ये २३ मधील १७ गुण गमावले. बियांकाने सामन्यात तब्बल सहा वेळा सर्विस गमावली.
दुसरीकडे हसीह सू-वेई हिने याआधी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सिमोना हालेप, विंबल्डन विजेती नाओमी ओसाका हिला २०१९ मध्ये पराभवाचा धक्का दिला आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेनाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : रोहन बोपण्णा आणि बेन मॅकलॅचलनचा पराभव