मेलबर्न : वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पुरुष एकेरीमध्ये रशियाचा आघाडीचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. उपांत्य सामन्यात त्याने स्टेफानोस सितसिपासला ६-६, ६-२, ७-५ असे हरवले. अंतिम फेरीत त्याचा सामना सर्बियाचा दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविचशी होणार आहे.
गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोकोव्हिचसाठी उपांत्य फेरीचा सामना सोपा गेला. त्याने या फेरीत रशियाच्या अस्लान करात्झेव्हचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
-
🇷🇺 Daniil Domination 🇷🇺@DaniilMedwed is into his first #AusOpen final.
— #AusOpen (@AustralianOpen) February 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The world No.4 will face Novak Djokovic.#AO2021 pic.twitter.com/p4rlCliDXV
">🇷🇺 Daniil Domination 🇷🇺@DaniilMedwed is into his first #AusOpen final.
— #AusOpen (@AustralianOpen) February 19, 2021
The world No.4 will face Novak Djokovic.#AO2021 pic.twitter.com/p4rlCliDXV🇷🇺 Daniil Domination 🇷🇺@DaniilMedwed is into his first #AusOpen final.
— #AusOpen (@AustralianOpen) February 19, 2021
The world No.4 will face Novak Djokovic.#AO2021 pic.twitter.com/p4rlCliDXV
महिलांमध्ये विजेतेपदासाठी ओसाका-ब्रॅडी भिडणार
तर, महिलांमध्ये जपानची नाओमी ओसाका आणि जेनिफर ब्रॅडी विजेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ओसाकाने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला उपांत्य सामन्यात धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने सेरेनाच्या विक्रमी २४वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या स्वप्नाला सुरुंग लावला. तर, अमेरिकेच्या २२व्या मानांकित जेनिफर ब्रॅडीने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हा हिचा उपांत्य लढतीत ६-४, ३-६, ६-४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
हेही वाचा - डू प्लेसिसपाठोपाठ अजून एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!