ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आज 'महामुकाबला' - नोव्हाक जोकोविच लेटेस्ट बातमी

डॅनिल मेदवेदेवने उपांत्य सामन्यात स्टेफानोस सितसिपासला हरवले. तर, गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोकोव्हिचसाठी उपांत्य फेरीचा सामना सोपा गेला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या मेदवेदेवने आजचा सामना जिंकला तर, तो क्रमवारीत दुसऱ्या स्थानी उडी घेईल.

जोकोविच आणि मेदवेदेव
जोकोविच आणि मेदवेदेव
author img

By

Published : Feb 21, 2021, 7:07 AM IST

मेलबर्न - वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या महामुकाबल्यामध्ये आज दोन नामवंत खेळाडू एकमेकासंमोर उभे ठाकणार आहेत. 'वर्ल्ड नंबर वन' सर्बियाचा दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि रशियाचा 'स्टार' खेळाडू डॅनिल मेदवेदेव यांच्यात पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळख असलेला जोकोविच आपल्या १८व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

दुसरीकडे, सलग २० सामने जिंकत मेदवेदेवने सर्वांना थक्क करत आपला स्पप्नवत प्रवास सुरू ठेवला आहे. त्याने अव्वल-१० टेनिसपटूंपैकी १२ खेळाडूंना पराभूत केले आहे. जोकोव्हिचने मेदवेदेववर चार विजय मिळवले असले, तरी मेदवेदेनेही त्याला तीन वेळा पराभूत करण्याची किमया साधली आहे. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या मेदवेदेवने आजचा सामना जिंकला तर, तो क्रमवारीत दुसऱ्या स्थानी उडी घेईल. ''मी एक आव्हान देणारा मनुष्य आहे. अंतिम फेरीत आठ वेळा खेळलेल्या आणि प्रत्येक वेळी जिंकलेल्या माणसाला मी आव्हान देऊ इच्छितो आणि मी याबद्दल आनंदी आहे. मला नोवाक विरुद्ध खेळायला आवडते. टेनिसच्या इतिहासातील तो महान टेनिसपटूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध अंतिम सामना खेळणे मोठी कामगिरी असेल. मी याबद्दल खरोखर आनंदी आहे'', असे मेदवेदेवने सांगितले.

जोकोविच-मेदवेदेव यांचे उपांत्य सामने -

डॅनिल मेदवेदेवने उपांत्य सामन्यात स्टेफानोस सितसिपासला ६-६, ६-२, ७-५ असे हरवले. तर, गतविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोकोव्हिचसाठी उपांत्य फेरीचा सामना सोपा गेला. त्याने या फेरीत रशियाच्या अस्लान करात्झेव्हचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

महिलांमध्ये ओसाकाची बाजी -

ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन खेळाडू जेनिफर ब्रॅडीचा पराभव करत यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला. ओसाकाने दोन सेटमध्ये ब्रॅडीचा ६-४, ६-३ असा पराभव केला. आठव्यांदा ग्रँडस्लॅममध्ये खेळताना तिने चारवेळा विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा - इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; दोन यष्टीरक्षकांचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.