ETV Bharat / sports

Australian Open २०२० : कोकोचा व्हिनसला धक्का; सेरेना, नाओमी, फेडरर दुसऱ्या फेरीत - सेरेनाला दुसऱ्या फेरीत

वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिली एकेरीत सेरेना विल्यम्स, गतविजेती नाओमी ओसाका आणि पुरूष गटात रॉजर फेडररने दुसरी फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे व्हिनस विल्यम्सला अमेरिकेच्याच १५ वर्षीय कोरी गॉफने पराभवाचा धक्का दिला.

Australian Open 2020 : serena osaka federer enters second round Cori 'Coco' Gauff beats Venus Williams
Australian Open 2020 : कोकोचा व्हिनसला धक्का; सेरेना, नाओमी, फेडरर दुसऱ्या फेरीत
author img

By

Published : Jan 20, 2020, 12:43 PM IST

Updated : Jan 20, 2020, 1:04 PM IST

मेलबर्न - वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिली एकेरीत सेरेना विल्यम्स, गतविजेती नाओमी ओसाका आणि पुरूष गटात रॉजर फेडररने दुसरी फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे व्हिनस विल्यम्सला अमेरिकेच्याच १५ वर्षीय कोरी गॉफने पराभवाचा धक्का दिला.

महिला एकेरी -

  • अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने पहिल्या फेरीत रशियाच्या एनस्टासिया पोटापोवाचा ६-०,६-३ ने एकतर्फी पराभव केला. सेरेनाने पहिला सेट अवघ्या १ मिनिटात जिंकला.
    Australian Open 2020 : serena osaka federer enters second round Cori 'Coco' Gauff beats Venus Williams
    सेरेना विल्यम्स
  • गतविजेती जपानच्या नाओमी ओसाकाने झेक रिपब्लिकच्या मॅरी बोजकोवाचा ६-२, ६-४ ने पराभव केला. ८० मिनिटे रंगलेल्या सामन्यात नाओमीने बाजी मारली आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

    नाओमी ओसाका
  • व्हिनस विल्यम्सला तिच्याच देशाच्या १५ वर्षीय कोरीने पराभवाचा धक्का दिला. १ तास ३७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात कोरीने ७-६ (७/५), ६-३ अशी मात दिली.
  • डेनमार्कची कारोलिन वोजनियाकीनेही दुसरी फेरी गाठली आहे. तिने अमेरिकेच्या क्रिस्टी एन हिचा ६-१, ६-३ ने पराभव केला.

पुरुष एकेरी -

  • स्वित्झर्लंडचा रॉजर फेडररने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या स्टिव्ह जॉन्सनला सहज मात दिली. त्याने १ तास २१ मिनिटे रंगलेल्या सामन्यात जॉन्सनचा ६-३, ६-२, ६-२ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली.

    रॉजर फेडरर
  • कॅनडाचा युवा खेळाडू डेनिस शापोवालोव्हला पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. हंगेरीच्या मार्टन फुकसोविक्सने त्याला ६-३, ६-७ (७/९), ६-१, ७-६ (७/३) ने मात दिली.
  • इटलीच्या माटियो बेरेटिनी आणि अर्जेंटिनाचा गुईडो पेला यांनीही दुसरी फेरी गाठली. माटियोने ऑस्ट्रेलियाच्या अ‌ॅड्र्यू हॅरिसचा ६-३, ६-१, ६-३ ने पराभव केला. तर पेलाने ऑस्ट्रेलियाच्याच जॉन पॅट्रिक स्मिथला ६-३, ७-५, ६-४ अशी मात दिली.

कोण आहे कोरी ?
कोको असं तिला प्रेमानं म्हणतात. १५ मार्च २००४ साली अ‍ॅटलांटा मध्ये कोकोचा जन्म झाला. ती लहान असताना तिच्या पालकांनी टेनिससाठी फ्लोरिडाला जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासूनच या मुलीच्या हातात रॅकेट आले. तिची आई उत्तम अ‍ॅथलिट, तर वडील बास्केटबॉल प्लेअर आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jan 20, 2020, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.