ETV Bharat / sports

विम्बल्डन स्पर्धा : केर्बर, एश्ले बार्टी दुसऱ्या फेरीत; निकल किर्गियोसला विजयासाठी लागले झगडावे

विम्बल्डन विजेती एंजेलिक केर्बर आणि जागतिक क्रमवारीत एक नंबरवर असलेल्या ऑस्ट्रेलियाची एश्ले बार्टी दुसऱ्या फेरीत दाखल झाले आहे. केर्बर हिने हमवतनच्या तातजाना मारिया हिचा ६-४, ६-३ ने सरळ सेटमध्ये पराभव केला. एश्ले बार्टीने चीनच्या सईसई झेंगचा ६-४, ६-२ असा पराभव केला.

विम्बल्डन स्पर्धा : केर्बर, एश्ले बार्टी दुसऱ्या फेरीत; निकल किर्गियोसला विजयासाठी लागले झुंजावे
author img

By

Published : Jul 2, 2019, 9:27 PM IST

लंडन - विम्बल्डन विजेती एंजेलिक केर्बर आणि जागतिक क्रमवारीत एक नंबरवर असलेली ऑस्ट्रेलियाची एश्ले बार्टी दुसऱ्या फेरीत दाखल झाल्या आहेत. केर्बर हिने हमवतनच्या तातजाना मारिया हिचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. एश्ले बार्टीने चीनच्या सईसई झेंगचा ६-४, ६-२ असा पराभव केला.

या वर्षीची फ्रेंच ओपन विजेती एश्ले हिने सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत झेंगचा सरळ सेटमध्ये पराभव केला. एक तास १६ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात एश्ले हिने एकतर्फी पराभव करत दुसरी फेरी गाठली. तर दुसऱ्या सामन्यात केर्बर हिने हमवतनच्या मारिया हिला एक तास २१ मिनिटात पराभूत केले.

पुरुष गटात ऑस्ट्रेलियाच्या निकल किर्गियोसला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजयासाठी झगडावे लागले. किर्गियोसला हमवतनच्या जॉर्डन थॉम्पसनने चांगली झुंज दिली. तीन तास २६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात शेवटी किर्गियोसने ७-६ (७-४), ३-६, ७-६ (१२-१०), ०-६, ६-१ ने पराभव करत दुसऱ्या फेरीत दाखल झाला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.