ETV Bharat / sports

अँडी मरेची ब्रिटनच्या प्रदर्शनीय स्पर्धेतून माघार - murray withdraws from brits tournament

"अँडी मरेने कॅमेरून नॉरीबरोबर होणाऱ्या तिसर्‍या स्थानावरील प्लेऑफ सामन्यातून माघार घेतली आहे. आता त्याची जागा जेम्स वार्ड घेईल," असे एलटीएने आपल्या वेबसाईटवर सांगितले.

Andy murray withdraws from the brits exhibition tournament
अँडी मरेची ब्रिटनच्या प्रदर्शनीय स्पर्धेतून माघार
author img

By

Published : Jun 28, 2020, 8:05 PM IST

लंडन - इंग्लंडचा स्टार टेनिसपटू अँडी मरेने ब्रिटनच्या प्रदर्शनीय स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिसर्‍या स्थानावरील प्ले-ऑफ सामन्यातून मरेने आपले नाव काढून घेतले. लॉन टेनिस असोसिएशनने (एलटीए) रविवारी ही माहिती दिली.

"अँडी मरेने कॅमेरून नॉरीबरोबर होणाऱ्या तिसर्‍या स्थानावरील प्लेऑफ सामन्यातून माघार घेतली आहे. आता त्याची जागा जेम्स वार्ड घेईल," असे एलटीएने आपल्या वेबसाईटवर सांगितले.

दुखापतीमुळे सात महिन्यांपासून कोर्टापासून दूर राहिल्यानंतर मरेने या चॅरिटी स्पर्धेतून पुनरागमन केले होते. त्याचा भाऊ जेमी याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. 33 वर्षीय मरेने मागील पाच दिवसांत चार सामने खेळले. यावेळी त्याने लियाम ब्रॉडी आणि वॉर्डचा पराभव केला होता. परंतु शनिवारी उपांत्य फेरीत डेन इव्हान्सकडून त्याला पराभव पत्करावा लागला.

सामाजिक अंतराचे नियम नसल्यामुळे नोव्हाक जोकोविचच्या अ‍ॅड्रिया टूरने टेनिसला बदनाम केले असल्याचे अलीकडेच मरेने म्हटले होते.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.