लंडन - टेनिस विश्वातील सर्वात जुनी आणि सर्वात मानाची असलेली विम्बल्डन ओपन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद पाहायला मिळाली. अमेरिकेच्या १५ वर्षीय कोको गॉफने दिग्गज टेनिसस्टार व्हिनस विलियम्सला पराभवाचा जबरदस्त धक्का दिला आहे.
कोको गॉफने ३९ वर्षीय व्हिनस विलियम्सला ६-४, ६-४ असे हरवत टेनिस विश्वात खळबळ उडवून दिली आहे. एक खास गोष्ट म्हणजे कोकोचा जन्म झाला होता तेव्हा व्हिनस विलियम्सने ४ ग्रँडस्लॅम जिंकले होते.
विजय मिळाल्यानंतर कोको म्हणाली, 'मला एकदम शॉक लागला आहे. हा विजय मिळाल्याने खूप खूष असून विम्बल्डनसाठी मला खेळायला मिळाले म्हणून मी स्वत:ला नशीबवान समजते'