भारत विरुध्द स्कॉटलंड यांच्यात टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच लढतीत शानदार विजय मिळवला आहे. भारतीय सलामी जोडी के एल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार खेळाच्या जोरावर भारताने 8 गडी व 81 चेंडू राखून स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवलाय यामुळे भारत गुणतालिकेमध्ये ग्रुप 2 मध्ये तिसऱ्या स्थानवर पोहोचला आहे. आजच्या विजयामुळे भारताचे रेटींगही वाढले आहे.
भारताचा 8 गडी व 81 चेंडू राखून स्कॉटलंडवर विजय
भारतीय सलामी जोडी के एल राहुल आणि रोहित शर्मा यांची जोडी मैदानात उकरली आहे. पहिल्याच षटकात चौकार ठोकून रोहितने आपल्या फटकेबाजीला सुरुवात केली. दुसऱ्या षटकाच्या सुरूवातीला एक उत्तुंग चौकार राहुलने मारला. त्यानंतर या षटकात त्याने 3 चौकार मारले. तिसऱ्या षटकातही राहुलने पुन्हा चौकार ठोकलाआणि त्यापाठोपाठ एक षटकार थेट प्रेक्षकांच्यात पाठवला. 3 षटकात बिनबाद 39अशी धावसंख्या फलकावर झळकत होती.
-
India unleash the 🎆#T20WorldCup | #INDvSCO | https://t.co/nlqBbYrz37 pic.twitter.com/3XRPyr4n3P
— T20 World Cup (@T20WorldCup) November 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India unleash the 🎆#T20WorldCup | #INDvSCO | https://t.co/nlqBbYrz37 pic.twitter.com/3XRPyr4n3P
— T20 World Cup (@T20WorldCup) November 5, 2021India unleash the 🎆#T20WorldCup | #INDvSCO | https://t.co/nlqBbYrz37 pic.twitter.com/3XRPyr4n3P
— T20 World Cup (@T20WorldCup) November 5, 2021
चौथ्या षटकाची सुरुवात रोहितने षटकाराने केली. त्यानंतर चौकार, पुन्हा चौकार मारुुन चौदा धावा कुटल्या. पाचव्या षटकाची सुरुवात पुन्हा फटकेबाजीने झाली. के एल राहुलने एक षटकार व एक चौकार मारुन एक धाव घेतली व स्ट्राईक रोहितकडे दिला. त्यानेही पुन्हा उत्तंग फटका मारुन चौकार काढला. पण त्यानंतर तो पायचीत होऊन 30 धावावर परतला. 16 चेंडूत त्याने या धावा काढल्या. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. राहुलने आपली फटकेबाजी चालूच ठेवली. सहाव्या षटकात त्याने 1 षटकार व 1 चौकार मारला परंतु फटकेबाजीच्या नादात त्यांचा उंच झेल पकडला गेला. 50 धावा नावावर झळकवून तो माघारी फिरला.
सातव्या षकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून सुर्यकुमारने विजयाचा पाया भक्कम केला.
स्कॉटलंड संघाची अडखळत सुरुवात
स्कॉटलंडच्या संघाची सुरुवात काइल कोएत्झर आणि जॉर्ज मुन्सी यांनी केली. कर्णधार कोएत्झरला बुमराहने चकवले तोव्हा संघाची धावसंख्या 13 होती. त्यानंतर जॉर्ज मुन्सीने फटकेबाजी करुन भारतीय गोलंदाजांना चकित केले. मात्र मोहम्मद शमीच्या एका चेंडूला फटकवण्याच्या नादात तो झेलबाद झाला. हार्दिक पांड्याने कोणतीही चूक न करता हा झेल टिपला. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू क्रॉस आणि रिची बेरिंग्टन यांना खेळपट्टीवर टिकाव धरला नाही आणि रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीव हे दोघही झटपट तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या कॅलम मॅकलिओड, मायकेल लीस्क भारतीय गोलंदाजांसमोर दबावाखाली खेळताना दिसले. 10 षटकात स्कॉटलंडचा संघ 4 बाद 44 इतकी धावसंख्या उभारु शकला.
मायकेल लीस्कने आक्रमक पवित्रा घेऊन फलंदाजी करायला सुरूवात केली. त्याने 11 व्या षटकात शमीच्या गोलंदाजीवर षटकार आणि चौकार ठोकत सामन्यातील आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रविंद्र जडेजाने पुन्हा कमाल दाखवत स्कॉटलंडच्या मायकेल लीस्कला 21 धावांवर पायचीत केले आणि संघाचे निम्मे खेळाडू तंबूत परतले.
त्यानंतर कॅलम मॅकलिओडच्या साथीला ख्रिस ग्रीव्ह्स फलंदाजीला आला. भारताच्या टिच्चून गोलंदाजीमुळे स्कॉटलंडचे खेळाडू चाचपडत खेळताना दिसले.
रविंद्र जडेजाच्या फिरकीपुढे स्कॉटलंड ढेपाळले, संघ 85 धावात तंबूत परतला
रविंद्र जडेजाच्या फिरकीसमोर स्कॉडलंडचे खेळाडू तग धरु शकले नाही. त्याने 4 षटकात 3 गडी बाद केले. तर मोहम्मद शमीनेही 3 षटके गोलंदाजी करुन 15 धावात 3 गडी बाद केले. विशेष म्हणजे त्याने सलग 3 चेंडू 3 गडी माघारी धाडले. यातील दुसऱ्या चेंडूवर फलंदाज धावबाद झाला होता. 81 धावा करताना स्कॉटलंडने आपले 7 खेळाडू गमावले. 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस ग्रीव्ह्स केवळ 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या सफयान शरीफने आपले खातेही उघडले नाही. त्यापाठोपाठ आलेल्या अलास्डेअर इव्हान्सलाही आपले खाते उघडता आले नाही. शमीने त्याला माघारी धाडले. यामुळे संघाची अवस्था 9 बाद 82 अशी झाली. अखेर जसप्रित बुमराहने अखेरचा प्रहार केला आणि स्कॉलंडचा संघ 85 धावात तंबूत परतला.
भारत-स्कॉटलंड पहिल्यांदाच आमने सामने
भारत विरुध्द स्कॉटलंड यांच्यात टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांची मैदानातील शक्ती पहिल्यांदाच कळेल. असे असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरील आकडेवारी पाहता भारताचे पारडे खूप जड आहे.
दोन्ही संघांतील खेळाडूंची नावे
भारताचा संघ - विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
स्कॉटलंडचा संघ - काइल कोएत्झर (कर्णधार), जॉर्ज मुन्सी, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), रिची बेरिंग्टन, कॅलम मॅकलिओड, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्ह्स, मार्क वॉट, सफयान शरीफ, अलास्डेअर इव्हान्स, ब्रॅडली व्हील.