ETV Bharat / sports

T20 WC : टीम इंडियाकडून देशवासियांना Happy Diwali, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय - India v Afghanistan

टी 20 विश्वचषक स्पर्धेत आजचा सामना भारत विरुध्द अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. भारताने या स्पर्धेत पाकिस्तान व न्यूझिलंड या संघाकडून दोनदा पराभव पत्करल्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान अफगाणीस्तानने टॉस जिंकला असून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार मोहम्मद नबी याने घेतला आहे.

भारतीय संघाला मोठ्या फरकाने विजयाची अपेक्षा

author img

By

Published : Nov 3, 2021, 6:58 PM IST

Updated : Nov 4, 2021, 1:53 AM IST

दिवाळीच्या मूहूर्तावर टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) सामन्यात भारतीय टीमने दमदार विजय मिळवला आहे. फलंदाजीने मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत भारतीय संघाने अफगाणिस्तानच्या टीमसमोर 210 धावांचां डोंगर उभा केला. त्यानंतर उत्तम गोलंदाजीने अफगाणिस्तानला 144 धावांवर रोखत 66 धावांनी विजय मिळवला.

रोहित-राहुल जोडीची मोठी भागीदारी

पहिल्या दोन्ही सामन्यात दारुण पराभूत झालेला असल्याने आज पुन्हा ती पुनरावृत्ती होऊ नये या अपेक्षेने आज भारतीय टीमने खेळ केल्याचे दिसले. आधी पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर आज मात्र भारत आपल्या जुन्या रंगात परत आला. एका मोठ्या विजयाची नोंद भारतीय संघाने केली आहे. यावेळी रोहित-राहुल जोडीने उत्तम सलामी देत एक मोठी भागिदारी केली. ज्यानंतर शमी, आश्विन, बुमराह यांच्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला कमी धावसंख्येत रोखलं.

भारतीय संघाची दमदार सुरुवात

भारतीय संघाच्या सलामीला आलेल्या के एल राहुल आणि रोहित शर्मा यांनी जोरदार फटकेबाजीला सुरूवात केली. दोन सामन्यात सलमीची जोडी यशस्वी झाली नव्हती. मात्र पहिल्यांदाच शतकी भागीदारी करीत या जोडीने कसर भरुन काढली आहे.

भारतीय संघाचा 142 धावा असताना रोहित शर्मा बाद झाला. त्याने 47 चेंडूत 74 धावा केल्या. या झुंझार खेळीत त्याने 3 षटकार व 8 चौकारांची आतषबाजी केली. के एल राहुलनेही साजेशी खेळी करीत 48 चेंडूत 69 धावा काढल्या. यात त्याने 2 षटकार व 6 चौकार ठोकले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंत व हार्दिक पांड्याने फटकेबाजी करीत संघाची धावसंख्या 200 पार केली. यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक 210 धावा भारतीय संघाने केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात उभारल्या आहेत.

अफगाणीस्तान संघासमोर 211 धावा करण्याचे कठीण आव्हान भारताने ठेवले आहे. भारतीय संघाचे पारडे जड आहे. भारत आपला पहिला विजय साकारेल, परंतु मोठ्या फरकाने विजय मिळवण्याच्या दिशेने संघाने उत्तम पाऊल टाकले आहे.

दरम्यान अफगाणीस्तानने टॉस जिंकला असून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार मोहम्मद नबी याने घेतला आहे. आता भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभा करुन अफगाणीस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.

भारताचे पारडे जड

आजच्या सामन्यातील दोन्ही संघांचे आजवरची आंतरराष्ट्रीय आकडेवारी पाहिली तर भारतीय संघ श्रेष्ठ ठरतो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात यापूर्वी खेळण्यात आलेले दोन टी 20 आंतरराष्ट्रीय सामने भारताने जिंकले आहेत.

दोन्ही संघातील खेळाडू

भारताचा संघ - रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन/वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

अफगाणिस्तानचा संघ - मोहम्मद नबी (कर्णधार), हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), रहमानउल्लाह गुरबाज, नजीबुल्ला झादरान, करीम जनात, राशिद खान, गुलबदिन नैब, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.

हेही वाचा - बारा खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सत्कार

Last Updated : Nov 4, 2021, 1:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.