ब्राझील - रिओ डी जानेरो येथे सुरु असलेल्या शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी विजयी धडाका सुरु ठेवला आहे. या स्पर्धेत भारताच्या यशस्विनी देसवाल हिने १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
या सुवर्णपदकासह यशस्विनी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तिने अंतिम फेरीत तिने २३६.७ गुण मिळवत ओलेना कोस्तेविचला मागे टाकले. याच स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. याआधी ईलावेनिल वालारिवानने १० मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
-
Fantastic show by the young champ #Yashaswini Beaming here after a stellar show. Gold No 3🥇 🥇 🥇 for India. We are firmly on top of the medal charts @ISSF_Shooting World Cup #issfworldcuprio2019 pic.twitter.com/6WsTLZtIo4
— NRAI (@OfficialNRAI) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Fantastic show by the young champ #Yashaswini Beaming here after a stellar show. Gold No 3🥇 🥇 🥇 for India. We are firmly on top of the medal charts @ISSF_Shooting World Cup #issfworldcuprio2019 pic.twitter.com/6WsTLZtIo4
— NRAI (@OfficialNRAI) August 31, 2019Fantastic show by the young champ #Yashaswini Beaming here after a stellar show. Gold No 3🥇 🥇 🥇 for India. We are firmly on top of the medal charts @ISSF_Shooting World Cup #issfworldcuprio2019 pic.twitter.com/6WsTLZtIo4
— NRAI (@OfficialNRAI) August 31, 2019
हेही वाचा - ISSF वर्ल्ड कप : २० वर्षीय भारताची नेमबाजपटू सुवर्णपदक मिळवूनही अपयशी
ईलावेनिलने ही सुवर्णकामगिरी केली असली तरी, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्थान निश्चित करण्यात ती अपयशी ठरली. २० वर्षीय ईलावेनिलने २५१.७ गुण मिळवले, तर ब्रिटनच्या सीओनैड मॅकिन्टोशने २५०.६ आणि चीनच्या यिंग लिन यांनी २४९.५ गुण कमावत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.
दुसरीकडे, १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्णपदक तर, सौरभ चौधरीने कांस्यपदक पटकावून इतिहास रचला. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत अभिषेकने २४४.२ गुण कमावले. तर, सौरभला २२१.९ गुण मिळाले. अभिषेक आणि सौरभ यांनी पात्रता इवेंटमध्येच ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. या फेरीत सौरभ ५८४ गुणांसह चौथ्या तर, अभिषेक ५८२ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला होता.