लंडन: चीनची अव्वल महिला एकेरी टेनिसपटू झांग शुई हिला नॉटिंगहॅम ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत ( Nottingham Open quarterfinals ) तेरेजा मार्टिकोव्हाकडून 6-2, 6-3 असा पराभव पत्करावा लागला. 33 वर्षीय झांग गेल्या वर्षीच्या स्पर्धेत उपविजेती ठरली होती. तिने या वर्षीच्या मोहिमेला ग्रास-कोर्ट स्पर्धेत महिला एकेरीत चौथे मानांकित म्हणून सुरुवात केली होती.
वृत्त शिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या अनुसार, पहिल्या दोन फेऱ्या पार केल्यानंतर, शुक्रवारी जागतिक क्रमवारीत 41व्या क्रमांकावर असलेल्या चीनची उपांत्य फेरी गाठू शकली नाही. कारण तिला झेक प्रजासत्ताकच्या जागतिक क्रमवारीत 60व्या क्रमांकाच्या मार्टिनकोव्हाकडून पराभव पत्करावा लागला.
-
PEAKING in Nottingham 🙌
— wta (@WTA) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🇨🇿 Tereza Martincova reaches her first Nottingham semifinal with a stunning win over last year’s runner-up Zhang! #RothesayOpen pic.twitter.com/1w1hJ9uWvv
">PEAKING in Nottingham 🙌
— wta (@WTA) June 10, 2022
🇨🇿 Tereza Martincova reaches her first Nottingham semifinal with a stunning win over last year’s runner-up Zhang! #RothesayOpen pic.twitter.com/1w1hJ9uWvvPEAKING in Nottingham 🙌
— wta (@WTA) June 10, 2022
🇨🇿 Tereza Martincova reaches her first Nottingham semifinal with a stunning win over last year’s runner-up Zhang! #RothesayOpen pic.twitter.com/1w1hJ9uWvv
उपांत्य फेरीत मार्टिनकोव्हाचा ( tennis player Tereza Martincova ) प्रतिस्पर्धी ब्राझीलच्या बीट्रिझ हद्दाद माईया असेल, जिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ग्रीसच्या मारिया सक्कारीचा 6-4, 4-6, 6-3 असा पराभव केला. दुसरा उपांत्य सामना अमेरिकेचा अॅलिसन रिस्के आणि स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिया गोलुबिक यांच्यात होणार आहे.
पहिला सेट गमावल्यानंतर रिस्केने स्थानिक स्टार हॅरिएट डार्टचा 4-6, 6-2, 6-1 असा पराभव ( Defeat of star Harriet Dart ) करत अंतिम चारमध्ये पुनरागमन केले. विक्टोरिजा गोलुबिकने दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलजानोविकचा 6-3, 6-4 असा पराभव केला.
हेही वाचा - Fifa Nations Cup 2022 : भारतीय फुटबॉल संघाने इतिहास रचला; फिफा नेशन्स स्पर्धेसाठी ठरला क्वालिफाय