नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय देखरेख समितीचे अध्यक्षपद ज्येष्ठ बॉक्सर एमसी मेरी कॉम करणार आहे.
-
Boxer MC Mary Kom to head Oversight Committee for Wrestling Federation of India.
— ANI (@ANI) January 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Olympic medallist Yogeshwar Dutt, Dhyanchand awardee Trupti Murgunde, SAI member Radhica Sreeman and ex-CEO TOPS Cdr Rajesh Rajagopalan (Retd) also part of the committee pic.twitter.com/Dj1fUXP7LZ
">Boxer MC Mary Kom to head Oversight Committee for Wrestling Federation of India.
— ANI (@ANI) January 23, 2023
Olympic medallist Yogeshwar Dutt, Dhyanchand awardee Trupti Murgunde, SAI member Radhica Sreeman and ex-CEO TOPS Cdr Rajesh Rajagopalan (Retd) also part of the committee pic.twitter.com/Dj1fUXP7LZBoxer MC Mary Kom to head Oversight Committee for Wrestling Federation of India.
— ANI (@ANI) January 23, 2023
Olympic medallist Yogeshwar Dutt, Dhyanchand awardee Trupti Murgunde, SAI member Radhica Sreeman and ex-CEO TOPS Cdr Rajesh Rajagopalan (Retd) also part of the committee pic.twitter.com/Dj1fUXP7LZ
नेमलेल्या समितीत हे असणार खेळाडू : सरकारने ही समिती नेमली आहे, जी पुढील एक महिन्यासाठी WFI चे दैनंदिन काम पाहणार आहेत. पॅनेलच्या इतर सदस्यांमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, माजी बॅडमिंटनपटू आणि मिशन ऑलिंपिक सेल सदस्य तृप्ती मुरगुंडे, माजी TOPS सीईओ राजगोपालन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) माजी कार्यकारी संचालक (संघ) राधिका श्रीमन यांचा समावेश आहे.
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केली घोषणा : या पॅनलच्या स्थापनेची घोषणा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केली. विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी दहिया यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटूंनी WFI आणि शरण यांच्या विरोधात तीन दिवसीय संप पुकारल्यानंतर ठाकूर यांनी शनिवारी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
हे आहे प्रकरण : उत्तर प्रदेशचे राजकारण आणि त्यात स्वतःचे नाणे चालवणारा बाहुबली नेहमीच चर्चेत असतो. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह चर्चेत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह हे सध्या महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. गेल्या तीन दशकांपासून ते त्यांची जोरदार वक्तव्ये, बाहुबली इमेज आणि खटल्यांमुळे चर्चेत आहेत.
बृजभूषण शरण सिंह यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी : 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, खासदाराने आपल्या उमेदवारी अर्जादरम्यान दिलेल्या शपथपत्रात 4 खटले दाखल झाल्याचे सांगितले होते. खासदारावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला होता. गोंडाच्या कैसरगंजमधून सहावेळा खासदार राहिलेले बृजभूषण शरण सिंह यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि ते त्यांच्या विधानांमुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात आहेत.
मुलाखतीत दिली होती खुनाची कबुली : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण यांनी एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना खुनाची कबुली दिली होती. ते म्हणाले, 'रवींद्र सिंग, अवधेश सिंग आणि आम्ही तिघे मित्र होतो. त्यावेळी मी कॉन्ट्रॅक्टच्या लाइनमध्ये होतो आणि त्यावेळी मी रवींद्रला कामाला लावले. त्याचवेळी एका पंचायतीत गेलो. यावेळी हर्रयातील रणजितने घटनास्थळी हवाई गोळीबार करून वातावरण तयार केले. ती गोळी रवींद्र सिंगला लागली आणि तो जमिनीवर पडला. यानंतर, मी माझा हात किंकरमधून सोडवला आणि ज्याने त्याच्यावर गोळी झाडली त्याला पाठीत रायफलने गोळी घातली आणि तो तिथेच मरण पावला.'