ETV Bharat / sports

अर्जुन पुरस्कार न मिळाल्याबद्दल साक्षी मलिक निराश - sakshi malik after arjuna award

साक्षीने एका मुलाखतीत म्हटले, "लोकांनी मला अर्जुन पुरस्कार विजेती साक्षी मलिक म्हणून बोलवावे, अशी माझी इच्छा आहे. अशा गोष्टींसाठी खेळाडू सर्वकाही करतो. त्याला प्रत्येक पुरस्कार जिंकायचा असतो जेणेकरून त्याला प्रेरणा मिळेल. अर्जुन पुरस्कार जिंकण्यासाठी मला आणखी काय करावे लागेल, हे मला माहीत नाही. २०१६ मध्ये खेलरत्न मिळाल्याने मला फार आनंद झाला. मी त्या पुरस्काराचा आदर करते. पण मला नेहमी अर्जुन पुरस्कार हवा होता आणि ते माझे स्वप्न होते."

wrestler sakshi malik reaction after  not getting arjuna award 2020
अर्जुन पुरस्कार न मिळाल्याबद्दल साक्षी मलिक निराश
author img

By

Published : Aug 22, 2020, 1:37 PM IST

नवी दिल्ली - ऑलिम्पिकपदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने अर्जुन पुरस्काराच्या यादीतून आपले नाव हटवल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाला फटकारले आहे. यंदाच्या अर्जुन पुरस्काराच्या यादीतून साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना वगळण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंना यापूर्वी देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न मिळाला आहे.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल साक्षीला आणि २०१८ मध्ये जागतिक स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मीराबाई चानूला खेलरत्न प्रदान करण्यात आला आहे. मात्र, अर्जुन पुरस्कार न मिळाल्याबद्दल साक्षी निराश झाली आहे. सरकार तिच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत असल्याचेही तिने सांगितले.

साक्षीने एका मुलाखतीत म्हटले, "लोकांनी मला अर्जुन पुरस्कार विजेती साक्षी मलिक म्हणून बोलवावे अशी माझी इच्छा आहे. अशा गोष्टींसाठी खेळाडू सर्वकाही करतो. त्याला प्रत्येक पुरस्कार जिंकायचा असतो जेणेकरून त्याला प्रेरणा मिळेल. अर्जुन पुरस्कार जिंकण्यासाठी मला आणखी काय करावे लागेल, हे मला माहित नाही. २०१६ मध्ये खेलरत्न मिळाल्याने मला फार आनंद झाला. मी त्या पुरस्काराचा आदर करते. पण मला नेहमी अर्जुन पुरस्कार हवा होता आणि ते माझे स्वप्न होते."

अर्जुन पुरस्कार : अतनु दास (तिरंदाजी), द्युती चंद (एथलेटिक्स), सात्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन), चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन), विशेष भृगुवंशी (बास्केटबॉल), सुभेदार मनीष कौशिक (बॉक्सिंग), लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग), इशांत शर्मा (क्रिकेट) दीप्ति शर्मा (क्रिकेट), सावंत अजय अनंत (घोडेस्वार), संदेश झिंगन (फुटबॉल), अदिति अशोक (गोल्फ), आकाशदीप सिंह (हॉकी), दीपिका (हॉकी), दीपक हुड्डा (कबड्डी), काले सारिका सुधाकर (खो खो), दत्तू बबन भोकनळ (रोइंग), मनु भाकर (निशानेबाजी), सौरभ चौधरी (निशानेबाजी), मधुरिका सुहास पाटकर (टेबल टेनिस), दिविज शरण (टेनिस), शिवा केशवन (शीतकालीन खेळ), दिव्या काकरान (कुस्ती), राहुल आवारे (कुस्ती)), सुयश नारायण जाधव (पॅरा स्विमिंग), संदीप (पॅरा एथलेटिक्स) मनीष नरवाल (पॅरा निशानेबाजी).

ध्यानचंद पुरस्कार : कुलदीप सिंह भुल्लर (एथलेटिक्स), जिंसी फिलिप्स (एथलेटिक्स), प्रदीप श्रीकृष्ण गंधे (बॅडमिंटन), तृप्ति मुगंर्डे (बॅडमिंटन), एन. उषा (बॉक्सिंग), लाखा सिंह (बॉक्सिंग), सुखविंदर सिंह संधू (फुटबॉल), अजीत सिंह (हॉकी)), मनप्रीत सिंह (कबड्डी), जे. रंजीत कुमार (पॅरा एथलेटिक्स), सत्यप्रकाश तिवारी (पॅरा बॅडमिंटन), मंजीत सिंह (रोइंग), दिवंगत सचिन नाग (जलतरण), नंदन पी. बाल (टेनिस), नेत्रपाल हुड्डा (कुस्ती).

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.