नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगटने हरियाणा पोलीस दलातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. तिने १२ ऑगस्ट रोजी वडील महावीर फोगट यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच बबिताने १३ ऑगस्ट रोजी पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून दिला होता. दरम्यान, बबिता भाजपकडून आगामी निवडणूक लढू शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बबिता फोगटने राजीनामा देण्याचे कारण सांगितले की, 'मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षासोबत काम करायचे असेल तर आपण आपल्या इतर पदांचा राजीनामा द्यायला हवा. त्यामुळे मी माझा राजीनामा प्रशासनाकडे १३ ऑगस्ट रोजीच दिला होता.' भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बबिताने भारतीय जनता पक्षात सहभागी होऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा, अशा आशयाचे आवाहनात्मक ट्विट केले होते.
-
Wrestler & BJP leader Babita Phogat on resignation from her post in Haryana Police: I had joined the party, you can only join the party after submitting resignation else it would have been conflict of interest. I had submitted my resignation in August. (File pic) https://t.co/Iux6QBBrOU pic.twitter.com/DoKI0H9eQQ
— ANI (@ANI) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Wrestler & BJP leader Babita Phogat on resignation from her post in Haryana Police: I had joined the party, you can only join the party after submitting resignation else it would have been conflict of interest. I had submitted my resignation in August. (File pic) https://t.co/Iux6QBBrOU pic.twitter.com/DoKI0H9eQQ
— ANI (@ANI) September 12, 2019Wrestler & BJP leader Babita Phogat on resignation from her post in Haryana Police: I had joined the party, you can only join the party after submitting resignation else it would have been conflict of interest. I had submitted my resignation in August. (File pic) https://t.co/Iux6QBBrOU pic.twitter.com/DoKI0H9eQQ
— ANI (@ANI) September 12, 2019
१२ ऑगस्टला केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत बबिता फोगट आणि त्यांचे वडील महावीर फोगट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. बबिताचे वडील महावीर फोगट यांना द्रोणाचार्य पुरस्कारने सन्मानित करण्यात आले असून ते यापूर्वी अजय चौटाला यांच्या जननायक पक्षासोबत काम करत होते. चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीमध्ये महावीर फोगट हे स्पोर्ट विंगचे प्रमुखपद सांभाळत होते.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बबिता फोगटने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले होते. खट्टर यांनी काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीरची सून आणता येईल, असे वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान, बबिता फोगट गेले काही दिवस तंदुरुस्तीच्या कारणावरुन कुस्तीपासून काहीशी दूर आहे.