नवी दिल्ली: बजरंग पुनिया ( Bajrang Punia ) आणि विनेश फोगट ( Vinesh Phogat ) या स्टार भारतीय कुस्तीपटूंना 10 ते 18 सप्टेंबर दरम्यान बेलग्रेड, सर्बिया येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी ( World Wrestling Championships ) भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी लखनौ आणि सोनीपत येथील SAI च्या प्रशिक्षण केंद्रांवर निवड चाचणीनंतर भारतीय संघाची निवड करण्यात आली.
या महिन्याच्या सुरुवातीला बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला संघाचे नेतृत्व विनेश करणार आहे. तर पुरुषांच्या फ्रीस्टाइल संघात ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग ( Olympic medalist Bajrang Punia ) आणि रवी दहिया आणि 2019 च्या जागतिक अजिंक्यपद रौप्य विजेते दीपक पुनिया असतील. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ( Birmingham Commonwealth Games ) सुवर्णपदक जिंकणाऱ्या बजरंग (65 किलो), रवी दहिया (57 किलो) आणि दीपक पुनिया (86 किलो) यांना चाचण्यांमधून सूट देण्यात आली होती.
भारतीय संघ :
महिला : 50 किलो : फेर चाचणी होणार , 53 किलो : विनेश फोगट , 55 किलो : सुषमा शोकीन , 57 किलो : सरिता मोर , 59 किलो : मानसी अहलावत , 62 किलो : सोनम मलिक, 65 किलो : शेफाली, 68 किलो : निशा दहिया, 72 किलो : रितिका, 76 किलो : प्रियांका.
पुरुष : फ्रीस्टाइल : रवी दहिया (57 किलो), पंकज मलिक (61 किलो), बजरंग पुनिया (65 किलो), नवीन मलिक (70 किलो), सागर जगलान (74 किलो), दीपक मिर्का (79 किलो), दीपक पुनिया (86 किलो), विकी हुडा (92 किलो), विकी चहर (97 किलो), दिनेश धनखर (125 किलो) ग्रीको-रोमन : अर्जुन हलकुर्की (55 किलो), ज्ञानेंद्र (60 किलो), नीरज (६३ किलो), आशु (67 किलो), विकास (72 किलो), सचिन (77 किलो) , हरप्रीत सिंग (82 किलो), सुनील कुमार (87 किलो), दीपांशू (97 किलो), सतीश (130 किलो).
हेही वाचा - Colin De Grandhomme Retires : कॉलिन डी ग्रँडहोमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती