नूर सुल्तान (कझाकिस्तान ) - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत विनेश फोगटने ५३ किलो वजनी गटात अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँटचा पराभव करत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्क केले आहे. आता विनेश कांस्यपदकासाठी ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीशी लढणार आहे.
विनेश टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावणारी पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. तिने आज बुधवारी रेपचेस फेरीतील दुसऱ्या सामन्यात जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती साराचा हिचा ८-२ असा पराभव केला.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : विनेश, सीमाला 'कांस्य' जिंकून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी
दरम्यान, विनेशला मंगळवारी जपानची दिग्गज कुस्तीपटू मायु मुकाइदा हिच्याकडून विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह विनेशचे या स्पर्धेच्या अंजिक्यपदाचे आव्हान संपुष्टात आले. मात्र, मुकाइदाने ५३ किलोच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने विनेशच्या रेपचेसद्वारे कांस्य पदकाच्या आशा कायम राहिल्या होत्या.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : अमितसह भारताच्या चार बॉक्सिंगपटूंची उपांत्यपूर्व फेरीत धडक
रेपचेज राऊंडमध्ये विनेशला कांस्य पदाकासाठी तीन सामने खेळावी लागणार होती. यात तिने युक्रेनची यूलिया खावदजी ब्लाहनिया आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली सारा हिल्डेब्रँट यांचा पराभव केला. या दोन विजयासह तिने टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले तिकिट पक्के केले. विनेशला आता कांस्य पदकासाठी ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीशी हिच्याशी खेळावे लागणार आहे.