उलान-उदे (रशिया) - सहा वेळा जगज्जेती ठरलेली भारताची महिला बॉक्सर मेरी कोमचे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात मेरीला तुर्कीच्या बुसेनांज कारिकोग्लूकडून ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतासाठी तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मेरीच्या अपयशानंतर भारताचे गोल्ड जिंकण्याचे स्वप्न भारताची दुसरी बॉक्सर मंजू राणीने कायम ठेवले आहे. तिने ४८ किलो वजनी गटातून अंतिम फेरी गाठली आहे.
-
Manju scripts HISTORY!🔥
— Boxing Federation (@BFI_official) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
First 🇮🇳 women boxer after 18 years to reach the finals of #AIBAWorldBoxingChampionship on debut. @MangteC in 2001 had reached the finals.
Defeated 🇹🇭 WC 🥉medallist Chuthamat Raksat 4⃣-1⃣ to seal her berth in the 48kg. #PunchMeinHiaDum#GoforGold pic.twitter.com/86eREkMAtt
">Manju scripts HISTORY!🔥
— Boxing Federation (@BFI_official) October 12, 2019
First 🇮🇳 women boxer after 18 years to reach the finals of #AIBAWorldBoxingChampionship on debut. @MangteC in 2001 had reached the finals.
Defeated 🇹🇭 WC 🥉medallist Chuthamat Raksat 4⃣-1⃣ to seal her berth in the 48kg. #PunchMeinHiaDum#GoforGold pic.twitter.com/86eREkMAttManju scripts HISTORY!🔥
— Boxing Federation (@BFI_official) October 12, 2019
First 🇮🇳 women boxer after 18 years to reach the finals of #AIBAWorldBoxingChampionship on debut. @MangteC in 2001 had reached the finals.
Defeated 🇹🇭 WC 🥉medallist Chuthamat Raksat 4⃣-1⃣ to seal her berth in the 48kg. #PunchMeinHiaDum#GoforGold pic.twitter.com/86eREkMAtt
मंजू राणीने पहिल्यांदाच जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात थायलंडच्या की सी रकसात हिचा ४-१ ने पराभव केला. या विजयासह तिने भारतासाठी आपले रौप्य पदक निश्चित केले आहे.
दरम्यान, या स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात मेरी कोमला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. तर ५४ किलो वजनी गटातून भारतीय जमुना बोरोही पराभूत झाली. त्यानंतर ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत भारताची लोविनाचा चीनच्या के यांग लियूने पराभव केला. या भारतीय महिला बॉक्सरचा प्रवास उपांत्य फेरीत कांस्य पदकावर संपला. मात्र, मंजू राणीच्या रुपात गोल्डची आशा कायम आहे.
हेही वाचा - India Vs South Africa, 2nd Test: दक्षिण आफ्रिका ऑलआऊट २७५, भारताकडे ३२६ धावांची आघाडी
हेही वाचा - हिटमॅनला भेटण्यासाठी मैदानात घुसला चाहता; झटापटीत जमिनीवर कोसळला रोहित