नवी दिल्ली: भारतीय बॉक्सर शिक्षा (54 किलो), जास्मिन (60 किलो) आणि अनामिका (50 किलो) यांनी इस्तंबूल येथे सुरू असलेल्या IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या 12 व्या हंगामाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये ( World Boxing Championships Pre-Quarter Final ) प्रवेश करण्यासाठी आपले कौशल्य दाखवले. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जेंटिनाच्या हेरेरा मिलाग्रोस रोझारियोचा सामना करणाऱ्या शिक्षाने गुरुवारी आरामात विजय मिळवण्यासाठी उत्कृष्ट कौशल्य दाखवले. उपांत्यपूर्व फेरीत शिक्षाचा पुढील सामना रविवारी मंगोलियाच्या ओयंटसेटसेग येसुगेनशी होईल.
मूळची भिवानीची रहिवासी असलेल्या जस्मिनला थायलंडच्या दोन वेळा युवा आशियाई चॅम्पियन बुआपा ( Young Asian Champion Buapa )कडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीत प्रतिस्पर्ध्याला समजून घेण्यासाठी भारतीय बॉक्सरने थोडा वेळ घेतला आणि शेवटच्या दोन फेरीत जोरदार पुनरागमन करत 4-1 असा विजय मिळवला. रविवारी राऊंड ऑफ 16 मध्ये जस्मिनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अँजेला हॅरिसशी ( Jasmine vs. Angela Harris ) होणार आहे.
अनामिका रोमानियाच्या युजेनिया एंजेलविरुद्ध मॅटवर ( Eugenia Angel vs Anamika on mat ) उतरली, दोन्ही बॉक्सर्सनी जबरदस्त पंचांची देवाणघेवाण केली, परंतु अनामिकाने तिच्या वेगवान फूटवर्क आणि हालचालीने प्रतिस्पर्ध्यावर जोरदार हल्ला केला. रोहतकच्या बॉक्सरने प्रतिस्पर्ध्यावर 5-0 असा सहज विजय नोंदवला. अनामिकाचा पुढील सामना रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिस्टी ली हॅरिसशी होणार आहे. 20मे पर्यंत खेळल्या जाणार्या IBA महिला जागतिक चॅम्पियनशिपच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त यंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन वेळची आशियाई चॅम्पियन पूजा राणी ( Asian champion Pooja Rani ) (81किलो) आणि टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन (70किलो) शुक्रवारी आपापल्या राउंड ऑफ-16 सामने खेळणार आहेत. 2019 मध्ये रशियामध्ये झालेल्या स्पर्धेच्या शेवटच्या हंगामात भारतीय बॉक्सर्सनी एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली होती.
हेही वाचा -IPL 2022 PBKS vs RCB : प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंजाब आणि बंगळुरुमध्ये आज चुरस