ETV Bharat / sports

Tokyo Olympics : यंदाचा टोकियो ऑलिम्पिक इतर ऑलिम्पिकपेक्षा कसा आहे वेगळा; जाणून घ्या - Tokyo Olympic Games

टोकियो ऑलिम्पिकची सुरूवात उद्या 23 जुलैपासून होणार आहे. तर याची सांगता 8 ऑगस्टला आहे. दरम्यान, जपानमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे ऑलिम्पिकच्या आयोजकांनी अनेक नियम बनवले आहे. यादरम्यान, मागील ऑलिम्पिकपेक्षा टोकियो ऑलिम्पिक कसा वेगळा आहे, जाणून घ्या...

why-tokyo-olympics-will-be-like-no-other-amid-covid-19-here-is-the-datails
Tokyo Olympics : यंदाचा टोकियो ऑलिम्पिक इतर ऑलिम्पिकपेक्षा कसा आहे वेगळा; जाणून घ्या
author img

By

Published : Jul 22, 2021, 8:39 PM IST

टोकियो - यंदाचा ऑलिम्पिक कोरोना व्हायरसच्या सावटा खाली होत आहे. यामुळे ऑलिम्पिकसाठी खास नियमावली तयार करण्यात आली आहे. व्हायरसचा धोका पाहता खेळाडूंसाठी कठोर नियम तयार करण्याते आले आहेत. यंदाचा हा ऑलिम्पिक मागील सर्व ऑलिम्पिकपेक्षा वेगळा असणार आहे. ऑलिम्पिकची सुरूवात उद्या 23 जुलैपासून होणार आहे. तर याची सांगता 8 ऑगस्टला आहे. दरम्यान, जपानमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे ऑलिम्पिकच्या आयोजकांनी अनेक नियम बनवले आहे. यादरम्यान, मागील ऑलिम्पिकपेक्षा टोकियो ऑलिम्पिक कसा वेगळा आहे, जाणून घ्या...

उद्धाटन आणि सांगता सोहळ्याची रंगत कमी

कोरोनामुळे उद्धाटन सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानावर हजर राहता येणार नाही. रियो, लंडन आणि बिजींग ऑलिम्पिकमध्ये शानदार उद्धाटन सोहळा झाला होता. ज्यात हजारो कलाकारांनी प्रेक्षकांनी तुंडूब भरलेल्या स्टेडियममध्ये कला सादर करत उद्धाटन सोहळ्याची रंगत वाढवली होती. यंदा हा सोहळा कमीत कमी खेळाडूंच्या उपस्थितीत होणार आहे. अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये सांगितलं होत की, उद्धाटन सोहळ्यात 11 हजार अॅथलेटिक्सपैकी 6 हजार अॅथलेटिक्स सहभागी होतील.

स्वत:च घालावं लागेल पदक -

टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी अॅथलेटिक्सना स्वत:चे पदक स्वत:च घालावे लागणार आहे. याशिवाय अॅथलेटिक्स त्या पदकाचं चुंबन देखील घेऊ शकणार नाहीत. तसेच अॅथलेटिक्सना मंचावर मास्क घालणे अनिर्वाय आहे. ऑलिम्पिकमध्ये कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सतर्कता बाळगली जात आहे.

विनाप्रेक्षक होणार टोकियो ऑलिम्पिक -

टोकियो ऑलिम्पिक विनाप्रेक्षक होणार आहे. जपान सरकारने कोरोनाचा प्रसार पाहता हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ऑलिम्पिक इतिहासात असं पहिल्यादांच घडणार आहे.

अॅथलेटिक्ससाठी कडक नियमावली -

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या अॅथलेटिक्ससाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. यात खेळाडूंना दररोज कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच इतर खेळाडूंना हात मिळवण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे.

नियम मोडला तर परत मायदेशी पाठवलं जाणार

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्स, मीडिया तसेच अन्य अधिकाऱ्यांनी कोरोना संबंधी तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना क्रीडा प्रकारातून बाद केलं जाणार आहे किंवा जपानमधून बाहेर काढलं जाणार आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा कोठे आणि कधी सुरू होणार

हेही वाचा - 'राहुल द्रविड फक्त इंदिरानगरचा गुंडा नाही तर तो संपूर्ण भारताचा गुंडा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.