नवी दिल्ली - भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने नवीन वर्षाचा आरंभ सुवर्णपदकाने केला आहे. रोम रँकिंग सीरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत विनेशने सुवर्णपदक जिंकले. ५३ किलो वजनी गटात विनेशने ही कामगिरी नोंदवली.
हेही वाचा - चायनामन कुलदीप यादवने वनडेत रचला मोठा इतिहास
सुवर्णपदकाच्या लढतीमध्ये विनेशने इक्वेडोरच्या लुसिया एलिजाबेथ मेलेंड्रेसचा ४-० ने पराभव केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या कियान्यू पांगचा ४-२ असा पराभव करून विनेशने अंतिम फेरी गाठली होती. तर दुसरीकडे ५७ किलो वजनी गटात भारताची युवा कुस्तीपटू अंशु मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
पहिल्या फेरीत विनेशने युक्रेनच्या क्रिस्टीना बेरेजाला १०-० आणि उपांत्यापूर्व फेरीत चीनच्या लॅनुआन लुओला १५-५ ने मात दिली होती.