ETV Bharat / sports

पद्म पुरस्कार यादीत नाव न आल्याने कुस्तीपटू विनेश फोगाट नाराज, म्हणाली...

author img

By

Published : Jan 27, 2020, 6:46 PM IST

पद्म पुरस्काराच्या यादीत नाव नसल्याने, विनेश फोगाटने ट्विटर वरुन आपली नाराजी व्यक्त केली. तिने, केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार हे प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी असतात. मात्र मला असे जाणवत आहे की, हे पुरस्कार तुमच्या सध्याच्या कामगिरीवर दिले जात नाहीत. प्रत्येक वेळी योग्य व्यक्तींना डावलले जाते. हा एक नविन पॅटर्नच बनला आहे. २०२० ची यादीही याला अपवाद नाही. पुरस्कार कोणाला मिळणार हे नेमके ठरवतं तरी कोण? अशा शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली.

Vinesh Phogat lashes out at being ignored for Padma awards
पद्म पुरस्कार यादीत नाव न आल्याने कुस्तीपटू विनेश फोगाट नाराज, म्हणाली...

नवी दिल्ली - केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्काराच्या यादीत कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे नाव नसल्यामुळे तिने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.

पद्म पुरस्काराच्या यादीत नाव नसल्याने, विनेश फोगाटने ट्विटर वरुन आपली नाराजी व्यक्त केली. तिने, केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार हे प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी असतात. मात्र मला असे जाणवत आहे की, हे पुरस्कार तुमच्या सध्याच्या कामगिरीवर दिले जात नाहीत. प्रत्येक वेळी योग्य व्यक्तींना डावलले जाते. हा एक नविन पॅटर्नच बनला आहे. २०२० ची यादीही याला अपवाद नाही. पुरस्कार कोणाला मिळणार हे नेमके ठरवतं तरी कोण? अशा शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, दरवर्षी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते. या वर्षी क्रीडा क्षेत्रातून बॉक्सर मेरी कोमला पद्मविभूषण, बॅडमिंनटपटू पी. व्ही. सिंधूला पद्मभूषण तर क्रिकेटपटू झहीर खान, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, माजी हॉकीपटू एम. पी. गणेश, नेमबाजपटू जितू राय, भारताच्या महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार ओनिअम बेंबम देवी, तिरंदाज तरुणदीप राय यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा - मेरी कोमला पद्मविभूषण तर, सिंधूला पद्मभूषण

हेही वाचा - ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.