ETV Bharat / sports

Uber Cup 2022 : पीव्ही सिंधूला दाखवता आली नाही कमाल, दक्षिण कोरियाकडून भारताचा 5-0 ने पराभव - पीव्ही सिंधुचा पराभव

बॅंकॉकमध्ये सुरू असलेल्या उबेर चषक 2022 च्या त्यांच्या अंतिम गट लढतीत टीम इंडियाने बॅक टू बॅक दोन विजयांची नोंद केल्यानंतर, बुधवारी दक्षिण कोरियाविरुद्ध 5-0 ने पराभव केला. ड गटातील सामन्यात जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूला आन सेँगकडून पराभव पत्करावा लागला. 42 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूचा 15-21, 14-21 असा पराभव झाला.

PV Sindhu
PV Sindhu
author img

By

Published : May 11, 2022, 7:57 PM IST

बँकॉक/थायलंड: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूच्या ( Olympic medalist PV Sindhu ) नेतृत्वाखाली भारतीय महिला बॅडमिंटन संघाला, उबेर चषक स्पर्धेतील शेवटच्या गट डी सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. कॅनडा आणि अमेरिकेविरुद्ध सहज विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला वास्तवाचा सामना करावा लागला आणि पाच सामन्यांत एकही सामना जिंकता आला नाही.

परंतु, या पराभवाचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. कारण त्याने गटात पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवताना उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले होते. अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूसाठी ( Badminton player PV Sindhu ) हा सामना निराशाजनक होता. कारण तिला जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या आन सेओंगकडून सरळ गेममध्ये 15-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. सिंधूचा सेओंगकडून हा सलग पाचवा पराभव असून कोरियाला 1-0 अशी आघाडी मिळाली आहे.

त्याचबरोबर श्रुती मिश्रा आणि सिमरन सिंघी या जोडीला ली सोही आणि शिन सेंगचन या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या जोडीला फारसे आव्हान देता आले नाही आणि 39 मिनिटांत 13-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. त्यापाठोपाठ आकर्षी कश्यपने जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेल्या किम गा युनकडून 10-21, 10-21 असा पराभव पत्करला आणि कोरियन संघाला 3-0 अशी अभेद्य आघाडी मिळवून दिली.

किम हे जेओंग आणि कोंग ह्योंग यांनी तनिषा क्रास्टो आणि ट्रिसा जॉली यांचा 21-14, 21-11 असा पराभव केला. तर अश्मिता चालिहा हिला सिम युजिनकडून 18-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. थॉमस चषकाच्या क गटात भारतीय पुरुष संघाची लढत चायनीज तैपेईशी होणार आहे.

हेही वाचा - Sri Lanka Tour Of Pakistan : पाकिस्तान दौऱ्यावर श्रीलंकेच्या 15 सदस्यीय संघाचे चमारी अथापथू करणार नेतृत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.