ETV Bharat / sports

ऑलिम्पिक क्वालिफायर ट्रायलमधून सुशील कुमारची माघार - सुशील कुमारची ऑलिम्पिक क्वालिफायर ट्रायलमधून माघार

टोकियो ऑलिम्पिक क्वालिफायर सीनियर अशियाई कुस्ती चॅम्पियनशीसाठी होणाऱ्या ट्रायलमधून भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने माघार घेतली आहे. फिट नसल्याने, सुशीलने ट्रायलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

two-time-olympic-medallist-sushil-kumar will-not-participate-in-olympic-qualifiers-senior-asian-wrestling-championship
ऑलिम्पिक क्वालिफायर ट्रायलमधून सुशील कुमारची माघार
author img

By

Published : Mar 16, 2021, 4:34 PM IST

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक क्वालिफायर सीनियर अशियाई कुस्ती चॅम्पियनशीसाठी होणाऱ्या ट्रायलमधून भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने माघार घेतली आहे. फिट नसल्याने, सुशीलने ट्रायलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्याने, कुस्ती महासंघाला कळवले आहे.

दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार म्हणाला, एसजीएफआयच्या संबधित मुद्यामुळे मला सरावाला पुरेसा वेळ मिळाला नाही. तसेच मी मानसिक रुपाने देखील तयार नाही. या कारणाने मी ट्रायलमधून माघार घेतली आहे.

टोकियो ऑलिम्पिक क्वालिफायर सीनियर अशियाई कुस्ती चॅम्पियनशीसाठी केडी जाधव इंडोर स्टेडियमध्ये ट्रायल होणार आहेत. यात प्रमुख कुस्तीपटू जितेंद्र कुमार, प्रवीण राणा, रोहित, अमित धनकड, नर सिंह यादव, सत्यव्रत कादिया आणि सुमित हे सहभागी होणार आहेत. ट्रायल फ्री स्टाइल ७४, ९७ आणि १२५ आणि ग्रीको रोमनसाठी ६०, ६७, ८७, ९७ आणि १३० किलो वर्गासाठी होणार आहेत.

हेही वाचा - त्याग असावा तर असा, ऑलिम्पिकसाठी भालाफेकपटूने सोडली 'ही' गोष्ट!

हेही वाचा - भवानी देवी ऑलिम्पिकसाठी पात्र, ठरली भारताची पहिली तलवारबाज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.